पुणे शहरामध्ये गेल्या 24तासात कोरोनाचे 221 नवीन रुग्ण


पुणे शहरामध्ये गेल्या 24तासात कोरोनाचे 221 नवीन रुग्ण

पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या वरआली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे आली आहे  . गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 221नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 254रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात  आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार  665इतके कोरोना बाधित रुग्ण  आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80हजार 678इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 9रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील5 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8879जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये सध्या 2108अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 209रुग्ण गंभीर आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8773 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणेमहापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News