पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पारनेर महसुलच्या न्यायविक्रीचा सत्यबोधी सुर्यनामा आंदोलनाची घोषणा


पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने   पारनेर महसुलच्या न्यायविक्रीचा सत्यबोधी सुर्यनामा आंदोलनाची घोषणा

आदिवासी बांधवांच्या जमीनी प्रकरणात तहसिलदार देवरे यांनी न्याय विक्री केल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत )- पारनेर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या जमीनी प्रकरणात तहसिलदार ज्योती देवरे यांनी महसुल न्याय विक्री केल्याचा आरोप करुन पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पारनेर महसुलच्या न्यायविक्रीचा सत्यबोधी सुर्यनामा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आदिवासी बांधव व संघटनांना बरोबर घेऊन तहसिलदार देवरे यांच्या विरोधात आक्रोश आंदोलन करुन सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

देवरे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्ट रोजी तयार करुन नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठविला होता. या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी देवरे यांना दोषी धरत कारवाईचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे. अशा अनेक प्रकरणात देवरे दोषी असून, महसुल न्याय विक्रीचा त्यांनी उच्चांक गाठला आहे. त्यांनी पन्नास वर्षापूर्वी मयत झालेल्या आदिवासी व्यक्ती विरोधात खटला चालवला. या प्रकरणात मयत व्यक्तीच्या वारसांचे म्हणने ऐकून न घेता त्यांनी हाकलून लावण्यात आले. पारनेर तालुक्यात तहसिलदारांनी पदाचा दुरोपयोग करुन अनागोंदी माजवली आहे. तर टाळेबंदीत पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतुक करण्यात आली. यामध्ये या भागातील अनेक रस्ते वाळूच्या डंपरमुळे खराब झाले आहेत. गैरकारभारातून त्यांनी कोट्यावधीची माया जमवली असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

देशात भ्रष्टाचार मुक्तीचा रणसंग्राम पेटविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालुक्यात तहसिलदार देवरे यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे. अशा भ्रष्टाचार प्रवृत्तीला लगाम लावण्यासाठी व आदिवासी बांधवांच्या जमिनी वाचवण्यासाठी सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केले जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News