एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु. चे घवघवीत यश


एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु. चे घवघवीत यश

कोल्हार :-(शिर्डी विभाग प्रतिनिधी राजमोहंमद शेख)   एप्रिल 2021 मध्ये झालेल्या इ. 8 वी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ( एन.एम.एम.एस. ) शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु शाखेने या ही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत आपले वर्चस्व सिद्ध केले.  या परीक्षेत 40 विद्यार्थी बसले होते. यातील 30 विद्यार्थी पास झाले व 18 विद्यार्थी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले. या विद्यार्थ्यांना दरवर्षी 12 हजार रु प्रमाणे 4 वर्ष   शिष्यवृत्ती मिळणार आहे. या 18 विद्यार्थ्यांना एकूण 8 लाख 64 हजार रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील 541 जागांच्या कोठ्या पैकी 356 जागा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने प्राप्त केल्या. त्यात न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक हे विद्यालय चौथ्या क्रमांकावर कोविड सारखा संसर्ग सुरू असताना तसे शाळा बंद असूनही शिक्षण थांबविले नाही विभागीय गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करण्यात आले विद्यार्थ्यांना ऑनलाइन तासीकेने ऑफलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले संस्थेमार्फत रोज तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळाले विद्यार्थ्यांचे एकूण 85 सराव घेण्यात आले. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विभागीय गुणवत्ता कक्ष प्रमुख, गुणवत्ता विकास कक्ष टीम, विषय शिक्षक, पालक यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे श्रम यामुळे विद्यार्थी यश प्राप्त करू शकले.                 NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र 18 विद्यार्थी खालीलप्रमाणे

१) शिरसाठ चैताली पंढरीनाथ ( जिल्ह्यात पाचवी)

 २) हाळनोर दिव्या भाऊ

 ३)शेख जायेद सर्फराज

 ४) कडनोर आकांक्षा नवनाथ

 ५) शिरडकर कल्याणी बाळासाहेब

 ६) गाडेकर आशुतोष संतोष

 ७) कोळपे ऐश्वर्या ज्ञानेश्वर

 ८) मोरे अनुष्का सागर

 ९) खर्डे श्रावणी दत्तात्रय

 १०) कोहकडे कुणाल

 ११) शिरसाठ यश अनिल

 १२) गायकवाड वैभव केशव

 १३) घोगरे वैष्णवी अनिल

 १४) दळवी सिद्धी राजू

 १५) कोते निशांत हेमंत

 १६) शिरसाठ चैतन्य राजेंद्र

 १७) घोगरे जुई ज्ञानेश्वर

 १८)राजभोज सिद्धी नवनाथ

या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख श्रीम. श्रीपतवाड ए. व्ही., श्रीम. शिंदे पी. एल., श्री नागटिळक एस. के., श्री धनवडे बी. आर., प्राचार्य श्री सोनवणे एस. के., उपप्राचार्य श्री कोकाटे पी. एल., पर्यवेक्षक श्री पावसे एम. टी. यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरुण कडू पाटील, जनरल बॉडी सदस्य श्री रावसाहेब म्हस्के पाटील, श्री रविंद्र देवकर पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष ॲड.श्री. सुरेन्द्र खर्डे पाटील, अशोक शेट आसावा, विभागीय अधिकारी मा. श्री कन्हेरकर टी. पी., सहाय्यक विभागीय अधिकारी मा. श्री वाळूंजकर के. एन., मा. श्री तापकिर एस. डी.  तसेच सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News