राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात आंदोलन


राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

गॅस दरवाढीचे समर्थन हास्यास्पद.....ॲड. वैशाली काळभोर

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी :

पिंपरी (दि. 21 ऑगस्ट 2021) महागाईने उच्चांक गाठला असतानाच केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत पंचवीस रुपयांनी वाढ केली आहे. मागील दिड महिण्यात पन्नास रुपयांनी गॅस दरवाढ झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी या दरवाढीचे केलेले समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. राष्ट्रीयस्थरावर इव्हेंट मॅनेजमेंट करुन सुरु केलेली उज्ज्वला गॅस योजना फसली आहे. यावरचे अनुदान देखिल मिळणे आता बंद झाले आहे. केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांच्या करातून जमा झालेल्या निधीचा इव्हेंट मॅनेटमेंटसाठी उपयोग करुन स्व:ताची छबी वारंवार नागरीकांपुढे आणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिला भगिनी तीव्र निषेध करीत आहे. तसेच ही दरवाढ मागे घेऊन घरगुती गॅसला किमान पंचवीस टक्के अनुदान द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर यांनी केले.

      राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी पक्षनेते जगदिश शेट्टी, नगरसेविका संगिता ताम्हाणे, गिता मंचरकर, स्वाती उर्फ माई काटे, अनुराधा गोफणे, महिला शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट, ओबीसी महिला सेल शहराध्यक्षा सारिका पवार तसेच विधानसभा शहराध्यक्षा संगिता कोकणे, मनिषा गटकळ, सहकार्याध्यक्षा सविता धुमाळ, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, प्रसाद शेट्टी, ज्येष्ठ कार्यकर्ते तारीक रिझवी, देविदास गोफणे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष युसूफ कुरेशी, उपाध्यक्ष अशपाक शेख, विजय दळवी, दिपक साकोरे, तसेच सुर्वणा कांबळे, फहमिदा जावेद शेख, मुमताज इनामदार, अनिता गायकवाड, उज्ज्वला ढोरे, वैशाली पवार, सोनाली जाधव, ज्योती गोफणे, रजीना फॉन्सीस, शितल जाधव, आरती जाधव, ज्योती निंबाळकर, सुंगधा पाषाणकर, सपना घाडगे, सारिका ढमे, स्वप्नाली आसावले, कमल मस्के, अर्चना राऊत, भारती कदम, नमिषा जटार, सुमन कांबळे, दिपा देशमुख, पुनम वाघ, वैशाली पवार, मोनिका जॉन्सन, पार्वती पवार, धर्मावती गुप्ता, वैशाली मिडगुले, संगीता वंजाळकर, पुष्पा पिटर, कोमल कवडे, अंकिता साबळे, उषा चिंचवडे, अनिता गायकवाड, मंगल ढगे, अश्विनी पोळ आदी उपस्थित होत्या.

        ॲड. वैशाली काळभोर म्हणाल्या की, देशभरातील पेट्रोल पंपापासून ते सर्व सामान्य नागरीकांच्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर आपली छबी प्रकाशित करणा-या या प्रसिध्दीलोलूप सरकारला नागरीक घरचा रस्ता दाखवतील. आता नागरीकांच्या संपत्ती विवरणपत्रावर, रेशनिंग कार्डवर, वाहन परवान्यावर, वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर, विद्यार्थ्यांच्या दाखल्यांवर व प्रमाणपत्रांवर आणि निवडणूक ओळखपत्र तसेच आधार कार्डवर मोदींचा फोटो छापणे बाकी आहे. नागरीकांच्या पैशातून स्व:ताची जाहिरात करण्यातच धन्यता मानणा-या या भाजपा सरकारला नागरीकांनी घरी बसवावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर यांनी केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News