विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा कब्जात बाळगणारा आरोपी राहूरी कारखाना परिसरातून जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .


विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा कब्जात बाळगणारा आरोपी राहूरी कारखाना परिसरातून जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत ) 

विक्री करण्याचे उद्देशाने गावठी कट्टा कब्जात बाळगणारा आरोपी राहूरी कारखाना परिसरातून जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. दिनांक २०/०८/२०२१ रोजी श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि , राहूरी ते राहूरी कारखाना जाणारे रोड लगत असलेल्या साक्षी हॉटेल येथे एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी घेवून येणार आहे , लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / सोमनाथ दिवटे , सपोनि / गणेश इंगळे , पोहेकॉ / मनोहर गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , पोना / शंकर चौधरी , रवि सोनटक्के , पोका रविन्द्र घुगासे , सागर ससाणे , रोहीत येमूल , चालक पोहेकॉ उमाकांत गावडे अशांनी मिळून दोन पंचासह शासकिय वाहनाने स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयातून निघून राहूरी ते राहूरी कारखना जाणारे रोडवर असलेल्या हॉटेल साक्षी येथे जावून पथकातील अधिकारी व अंमलदार हे हॉटेलचे आजूबाजू सापळा लावून थांबले . त्यानंतर काही वेळातच बातमी मधील एक संशईत इसम हॉटेलचे समोर येवून उभा राहीला व संशईत नजरेने आजूबाजूस टेहळणी करु लागला .पथकातील अधिकारी व अंमलदार यांची खात्री होताच त्यास घेराव घालून ताब्यात घेतले . त्यांस पथकातील अधिकारी यांनी पोलीस पथकाची व पंचाची ओळख देवून त्यास त्याचे नांव , पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव , पत्ता प्रेम पांडूरंग चव्हाण , वय- ३७ वर्षे , रा . बाजारतळ , दुबे गल्ली , वार्ड नं . ६ , श्रीरामपूर असे असल्याचे सांगीतले . त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण ३१,००० / -रु . किं . चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे . वरील नमुद असम प्रेम पांडूरंग चव्हाण हा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ / २१४५ मनोहर सिताराम गोसावी , नेम- स्थानिक गुन्हे शाखा , अ.नगर यांनी राहूरी पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . ।। ६ ९ ८ / २०२१ , आर्म अॅक्ट कलम ३/२५ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही राहूरी पो.स्टे . करीत आहेत . वरील नमुद आरोपी विरुध्द यापुर्वी सरकारी कामात अडथळा आणणे , बेकायदा गावठी कट्टे जवळ बाळगणे याबाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत . १ ) श्रीरामपूर शहर पो.स्टे . गुरनं . ॥ ११/२०१५ , भादवि कलम ३५३,३४ सह आर्म अॅक्ट कलम ३ / २५,७ प्रमाणे २ ) श्रीरामपूर शहर पो.स्टे . गुरनं . ।। ४६७/२०२१ , आर्म अॅक्ट कलम ३/२५ , ७ प्रमाणे सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती . दिपाली काळे , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व श्री . संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधीकारी , श्रीरामपूर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News