डोनेट एड सोसायटी तर्फे मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न


डोनेट एड सोसायटी तर्फे मंगळागौर कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे:भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि आमदार लक्ष्मण जगताप व सौ.अश्विनी ताई जगताप आयोजित आणि  डोनेट एड सोसायटी अध्यक्ष सारिका कृष्णा भंडलकर संयोजीत मंगळागौर आणि मेहंदी कार्यक्रम व पारंपरिक पोशाख स्पर्धा  शिवसृष्टी उद्यान  सांगवी येथे  घेण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन अश्विनी ताई जगताप आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मंगळागौर स्पर्धेमध्ये प्रभागातील आणि परिसरातील महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला मोठ्या संख्येने महिला यावेळी  या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मंगळागौर सादर करत असताना कशाप्रकारे फुगडी खेळतात ,त्यासोबतच मंगळागौर पूर्वी कशा पद्धतीने सादर केली जात होती हे या ठिकाणी दाखवण्यात आले. त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी पार पडले. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, नगरसेविका उषाताई मुंढे, नगरसेविका शारदा सोनवणे ,उज्वला ताई गावडे  पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष,सौ.अनुष्री ढोरे,सोनाली शिंपी

आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी वैशालीताई जवळकर, दर्शना कुंभारकर, सोनम गोसावी, कोमल काळे, तृप्ती कांबळे, सीमा पाटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे संयोजन मा.  संतोष कांबळे  आणि मा. कृष्णा भंडलकर मित्र परिवार यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News