शिव राष्ट्र सेना पक्षाच्या दलित आघाडी शहर सचिन पदी रजनीकांत आढाव यांची निवड शिव राष्ट्र सेना रूग्णांसाठी अॅंबुलंस सेवा देणार -संतोष नवसुपे


शिव राष्ट्र सेना पक्षाच्या दलित आघाडी शहर सचिन पदी रजनीकांत आढाव यांची निवड   शिव राष्ट्र सेना रूग्णांसाठी अॅंबुलंस सेवा देणार -संतोष नवसुपे

- मनसेच्या अॅलड.अनिता दिघे यांनी शिव राष्ट्र सेना पक्षात प्रवेश केला याप्रसंगी त्यांची महिला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करुन पत्र देतांना पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे. समवेत सचिव रजनीकांत आढाव, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, भिंगार मंडल अध्यक्ष राकेश सारवान, सौ.रत्ना नवसुपे, सौ.गायत्री कांबळे, सौ.वंदना भोखे, आश्विनी पाटील, आदि.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - स्टेशन रोड परिसरातील सामाजिक कार्यात सहभाग घेणारे रजनिकांत आढाव यांना दलित शहर सचिव पदाची नियुक्ती करण्यात आली ,  यावेळी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे, भिंगार मंडल अध्यक्ष राकेश सारवान, सौ.रत्ना नवसुपे, सौ.गायत्री कांबळे, सौ.वंदना भोखे, आश्विनी पाटील, सौ.संध्या जोशी आदि यावेळी उपस्थित होते.

यावेळी संतोष नवसुपे म्हणाले,कोरोना जागतिक महामारी मुळे जन जिवन विस्कळीत झाले असून प्रत्येक पक्ष संघटनेने आता रूगन सेवा म्हणुन भविष्यात जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्या अनुषंगाने पक्ष स्वतः ची अॅबुलंस उपलब्ध करून देणार पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्या पक्ष प्रयत्न करणार , असे रजनीकांत आढाव यांनी सांगितले.याप्रसंगी विनोद साळवे, अक्षय ससाणे,सुरज गायकवाड, अक्षय पाटकर आदि उपस्थित होते.


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News