शेवगांव तालुका युवासेने तर्फे मा माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर वॉर्ड क्रमांक १४ शास्त्रीनगर शेवगाव येथे संप्पन्न


शेवगांव तालुका युवासेने तर्फे मा माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या  वाढदिवसानिमित्त  भव्य नेत्ररोग तपासणी शिबिर वॉर्ड क्रमांक १४ शास्त्रीनगर शेवगाव  येथे संप्पन्न

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक १४ शास्त्रीनगर शेवगाव येथे संतोषीमाता मंदिरात  भव्य आरोग्य तपासणी, नेत्ररोग तपासणी व ताबडतोब चष्मा वाटप शिबिराचे उद्घाटन नगर दक्षिण चे शिवसेना महिला आघाडी  जिल्हासंघटक मंगलताई म्हस्के  यांच्या हस्ते झाले. शेवगाव तालुका व शहर येथे  शिवसेनेतर्फे 17 ठिकाणी नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शेवगाव शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून व नगर दक्षिणचे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांच्या संकल्पनेतून हे नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले. व त्यामाध्यमातून  जनतेची सेवा करणे हे एकच उद्देश ठेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला,  तसेच  नेत्ररोग तपासणी शिबिराची आवश्यकता व पुढील काळात इतर गंभीर आजारांबाबत  शिवसेनेमार्फत व युवासेनेमार्फत सेवा  दिली जाईल, असे  युवासेनेचे तालुका प्रमुख शितल पूरनाळे यांनी सांगितले.शिबिराला शेवगाव शहरातील लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद सोशल डिस्टिंग ठेवत दिला.  कार्यक्रमाला महिला आघाडी  जिल्हा संघटक मंगलताई  म्हस्के, तालुकाप्रमुख ऍड अविनाश मगरे, जेष्ठ शिवसैनिक व मार्गदर्शक एकनाथराव कुसळकर,  शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव काटे, शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे युवासेना तालुकाप्रमुख शीतल पुरनाळे, तालुकासंघटक महेश पुरनाळे,  शिक्षकसेना तालुका प्रमुख प्रा. गणेश पोटभरे, युवासेनेचे शहरप्रमुख महेश मिसाळ, शिवसेनेचे उपशहरप्रमुख कानिफ कर्डीले, पांडुरंग नाबदे, सुनील जगताप ऍड अतुल लबडे,  नंदू पातकळ, गणेश चेमटे 

 महिला आघाडीमध्ये उपजिल्हा संघटक मंदाकिनी कुलकर्णी, शहर संघटिका  ज्योती केदारी, चंद्रकला चेमटे  ह्या कार्यक्रमाचे आयोजक युवा सेना तालुका प्रमुख शितल पूरनाळे, महेश लातूरकर, राहुल सोनवणे, आशिष थोरात, अशोक आंधळे, ऍड अभिषेक ईखे, डॉ. शरद चव्हाण, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ शंतनू,  तसेच पंचक्रोशीतील व्यापारी, डॉक्टर, शेतकरी, आणि नागरिकांनी केले.

हार तुरे फ्लेक्स च्या खर्चाला फाटा देऊन मुख्य मंत्र्यांनी सांगिलत्या प्रमाणे अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजपयोगी लोकांचे आरोग्याच्या दृष्टीने मदत होईल अश्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यास शिवसेना शेवगांव तालुका च्या कार्यक्रमाने निश्चित मदत झाली आहे*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News