श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे शासनाचे सर्व नियम पाळून सत्यशोधक विवाह संपन्न,


श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे शासनाचे सर्व नियम पाळून सत्यशोधक विवाह संपन्न,

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात अवाजवी खर्च, ढोल ताशा,डामडौल याला फाटा देऊन सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न झाला आहे,

आढळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मु पो श्रीगोंदा येथील युवराज रामचंद्र कोथिंबिरे यांची कन्या चिरंजीवी कोमल वृद्धेश्वर पत्संस्था टेक्निकल विभाग तसेच आढळगाव येथील  केरू गेना शिंदे यांचे चिरंजीव , मुकेश  केरु शिंदे हे आढळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव यांचा विवाह आढळगाव सिद्धेश्वर लॉन येथे पार पडला, हा विवाह महात्मा फुले स्थापित सार्वजनिक सत्य धर्म नुसार पार पडला आहे यावेळी आढळगाव गावातील तसेच श्रीगोंदा तालुका विविध कार्यकारी सोसायटी तील सर्व संस्थांचे अधिकारी पदाधिकारी हजर होते यावेळी वधूवरांना शुभेच्छा श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक  पोपटआबा खेतमाळीस आढळगावचे सरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन यांनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या विवाहानंतर  वधू वरास अखिल भारतीय सत्यशोधक महासभा यांचे मार्फत प्रशस्तीपत्र ऍड संभाजीराव बोरुडे, पोपटराव खेतमाळीस गावातील जेष्ठ व्यक्ती यांच्या हस्ते देण्यात आले,संभाजीराव बोरुडे यांनी वधुवरांना शुभेच्छा दिल्या सचिन झगडे यांनी सत्यशोधक पध्दतीविषयी माहिती दिली व  वधुवरांना शुभेच्छा दिल्या  विवाह विधि सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी संपन्न केला, सध्या कोरोना संक्रमण काळ असूनही महाराष्ट्रातील सत्यशोधक कार्यकर्ते शासनाचे सर्व नियम पालन करून महात्मा ज्योतिराव फुले, संत तुकाराम, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे चांगल्या प्रकारे स्वग्रहण करून इतरांनाही सार्वजनिक सत्य धर्म नुसार जनजागृती व सर्व विधी कार्य तसेच लोकांच्या अडीअडचणी पार पाडत आहेत याचा अभिमान आहे आणि त्यालाही आपला समाज चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे त्यामुळे संत महापुरुषांचे विचाराकडे लोक  वळलेले दिसतात आणि या मुळे समाजामध्ये एक क्रांती घडून येईल असे म्हणण्यास हरकत नाही व बहुजन समाज पूर्ण जागा होऊन अनिष्ट रूढी परंपरा याला बाजूला सारून सार्वजनिक सत्य धर्मचा स्वीकार करतील असे यावेळी संभाजी बोरुडे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News