सायंबाच्यावाडीत रविवारी हिरुबाई देवी मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापना


सायंबाच्यावाडीत रविवारी हिरुबाई देवी मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापना

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)  बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी याठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने साकारलेल्या ग्रामदैवत हिरूबाई देवी मंदिर मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापना समारंभ रविवार दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ बारामती टेक्‍स्टाईल पार्कच्या अध्यक्षा आणि बारामती एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते होणार आहे. 

    हे मंदिर लोकवर्गणीतून उभे केले असून या मंदिरास अंदाजे ६५ लाख रुपये खर्च झाला आहे. हे मंदिर रंगरंगोटी व विद्युत रोषणाई केल्याने खूपच आकर्षक दिसत आहे. अशी माहिती समस्त ग्रामस्थ सायंबाचीवडी व स्वयंभू नवतरुण मंडळ सायंबाचीवाडी यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News