गोपाळवाडी येथे आरोग्य कट्टा च्या माध्यमातून डॉ मनोज लडकत यांचे आरोग्य विषयी मार्गदर्शन


गोपाळवाडी येथे आरोग्य कट्टा च्या माध्यमातून डॉ मनोज लडकत यांचे आरोग्य विषयी मार्गदर्शन

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार केला,सर्वच जनता यामुळे भयभीत आणि हैरान झाली आहे, प्रत्येक जण आर्थिक विवनचनेत आहे,अशावेळी सरळ मार्ग दाखवणारी आणि प्रत्येक रोगांपासून भयमुक्त करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, या विषयावर गोपाळवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले यांनी हडपसर येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर मनोज लडकत व डॉ राकेश वाघमोडे यांच्याशी चर्चा केली होती, सध्या हे दोन्ही डॉक्टर दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील कोविड सेंटर येथे कोरोना रुग्णांच्या  सेवेत आहेत, त्यांनी  अध्यक्षांच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आणि 15 ऑगस्ट रविवारी सकाळी स्वातंत्र्यदिनी शुभ कामाला सुरुवात झाली, डॉ मनोज लडकत यांनी प्रोजेकटर वर सर्व माहिती दिली, आणि कोरोना रोगापासून वाचण्यासाठी उपाय सांगितले, त्यांनी आरोग्यदायी कार्यक्रमाला आरोग्य कट्टा असे नाव दिले,आरोग्य कट्टा च्या माध्यमातून आपण दर रविवारी सकाळी 10 वाजता वेगवेगळ्या आजारावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले,त्यामध्ये संधीवात, सांधेदुखी, शुगर बीपी,महिलांचे आजार याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहेत,


यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले,ग्रामपंचायत उपसरपंच सूरज भुजबळ, सदस्य जयसिंग दरेकर,प्रविण होले,रोहन गारुडी,शरद होले,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार होले,माजी सदस्य विठ्ठल दरेकर तसेच या कार्यक्रमाला तरुण तसेच जेष्ठ नागरिक उपस्थित होते, सूत्रसंचालन विठ्ठल होले यांनी केले तर जयसिंग दरेकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News