२३ ऑगस्ट २०२१ रोजी महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नी बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलन


२३ ऑगस्ट २०२१ रोजी महापारेषण कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नी बेमुदत धरणे व निदर्शने आंदोलन

पुणे: महावितरण महापारेषण कंपनीतील कर्मचान्यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नासाठी वेळोवेळी पत्राद्वारे व बैठकीद्वारे चर्चा करूनही महापारेषणच्या प्रशासनाने प्रश्नांची सोडवणूक न केल्याने इंटक फेडरेशनने दि .२३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजले पासून इंटक फेडरेशन चे अध्यक्ष तथा मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली वीज कर्मचान्यांच्या खालील विविध मागण्यांवर न्याय मिळवून घेण्यासाठी बेमुदत धरणे व निदर्शन आंदोलन 

महापारेषण , प्रकाशगंगा , बांद्रा ( पूर्व ) मुंबई येथे सर्व कर्मचारी व इटक पदाधिकारी समवेत करणार आहोत. 


प्रमुख मागण्या १ ) अनुकंपातत्वावरील उमेदवारांना महापारेषण कंपनीच्या सेवेत त्वरीत सामावून घेण्यात यावे .


 २ ) कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थीना कंपनीच्या सेवेत महानिर्मिती कंपनीच्या धर्तीवर ५० % आरक्षण देऊन सामावून घेण्यात यावे


३) सन २०१६-२१ या ५ वर्षाच्या काळात स्टाफ सेटअपच्या नावाखाली प्रशासनाने वर्ग ३ व ४ च्या संवर्गाचे पदोन्नती पॅनल घेतलेले नाहीत . त्यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केलेले आहे त्यामुळे जुन्या पध्दतीनेच प्रथमत : पदोन्नती पॅनल त्वरीत घेण्यात यावेत . 


४ ) वरिष्ठ यंत्रचालक ते कनिष्ठ अभियंता यांची पदोन्नती कपनीचे परिपत्रक क्र .४५६ दि . ५/११/२०१५ नुसार घेणे गरजेचे असतानाही गेली ६-७ वर्ष पदोन्नती पॅनल घेतलेले नाहीत , तरी सदरये पदोन्नती पॅनल त्वरीत घेण्यात यावेत . 


५) महापारेषण कंपनीतील नाशिक परिमंडळातील सुरक्षारक्षक यांना सुधारीत वाढीव दराने माहे मे २०१३ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीचा वेतनातील फरक त्वरीत देण्यात यावा . 

 वरील मागण्यासंदर्भात महापारेषणये प्रशासन हे हेतुतः वेळकाढूपणाचे व आडमुठेपणाचे धोरण अवलंबत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात औद्योगिक कलह होण्याची दाट शक्यता आहे . कारण प्रशासनाचे सदर प्रश्ना वेळ काढूपणाचे धोरण असल्याने आजमितीस अनुकंपावत्यावरील उमेदवार व कौशल्यविकास योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांची वब ४५ पुर्ण होत असल्याने त्यांची नोकरी मिळण्यावर गदा येत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. तसेच विविध संवर्गातील पदोन्नती पॅनल ६-७ वर्ष न घेतल्याने कर्मचान्यांचे आर्थिक नुकसान प्रशासनाने केले आहे . त्यास प्रामुख्याने महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक ( मांस ) श्री.सुगत गमरे हेच जबाबदार आहेत , त्यामुळे इंटक फेडरेशनमार्फत मा . उर्जामंत्री यांना विनती करण्यात येते की , सदर अधिकान्यावर वरील वेळकाढूपणामुळे कर्मचान्यांवर अन्याय होत असल्याने कंपनी नियमाप्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी , आजच्या सदर पत्रकार परिषदेमध्ये इंटक फेडरेशनचे मुख्य महासचिव श्री.प्रकाश गायकवाड , कार्याध्यक्ष श्री गोविंदराव थोपटे , उपाध्यक्ष श्री.आबा पाटील , राष्ट्रीय मजदूर संघ पुणे अध्यक्ष श्री सुनिल शिंदे , महापारेषणचे सचिव श्री प्रकाश ठाकरे , संघटक श्री प्रविण लांडे , प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी श्री.रोहित यादव , श्री सुशांत साळवे इ . प्रतिनिधींनी पर्येत सहभाग घेतला व महापारेषणच्या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले कि , दि .२२ / ८ / २०२१ रोजी पासून सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे व निदर्शने आदोलनास सर्वांनी आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्यावर न्याय मिळागेकरिता  सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News