वरूर करांना ग्रामसेवक मिळेना जनतेची कामे होईना


वरूर करांना ग्रामसेवक मिळेना जनतेची कामे होईना

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव तालुक्यातील वरूर हे गाव साधारण पाच ते सात हजार लोकसंख्येचे गाव असून गावांमध्ये दीड महिना झाला तसा ग्रामसेवकच नाही गटविकास अधिकाऱ्याकडे वारंवार मागणी करूनही कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाही सामान्य जनतेची कामे अगदी जशीच्या तशी पडून आहेत त्यातच कोरोना डोकं वर काढतोय परंतु प्रशासनाच् वरुर करांवर कुठल्याही प्रकारच लक्ष नाही प्रत्यक्षात बी डी ओ साहेबांशी  संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही आज घडीला गावांमध्ये कोरोणा चे दहा ते पंधरा पेशंट असून तालुका आरोग्य वीभाग ही कुठल्याही प्रकारचे लक्ष देण्यास तयार नाही तसेच तसेच नूतन सरपंच बानेखा पठाण यांनीही प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदने दिली परंतु त्यांनाही कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दाद दिली नाही त्यामुळे ग्रामस्थांचे विविध दाखल्यांकरिता अतोनात हाल होत आहे तरी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन वरुर कराना त्वरित ग्रामविकास अधिकारी नियुक्त करावा अन्यथा वरुरकर मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत ग्रामस्थांचे  विविध दाखल्यांकरिता, घरकुलाच्या हप्त्यां करिता मोठी हेळसांड होत आहे त्यामुळे प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा

:- वरुर गाव हे तालुक्याच्या दृष्टीने खूप मोठे गाव आहे तसेच वरुर गावासाठी ग्रामविकास अधिकारी नियुक्त असायला हवा परंतु येथे ग्रामसेवक हि मिळेना याची तालुका प्रशासनाने वेळीच दखल घ्यायला हवी 

दादासाहेब पाचरणे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News