सैनिक बॅंकेच्या कर्जत शाखेत तेवीस लाखांचा अपहार झाला नसल्याचे लेखा परीक्षण अहवालातून स्पष्ट


सैनिक बॅंकेच्या कर्जत शाखेत तेवीस लाखांचा अपहार झाला नसल्याचे लेखा परीक्षण अहवालातून स्पष्ट

कर्जत प्रतिनिधी (मोतीराम शिंदे) - कर्जत येथील पारनेर सैनिक बँकेच्या लेखापरीक्षण अहवालात तेवीस लाख रूपयांचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे  स्पष्ट करण्यात आले असल्याची माहिती पारनेर सैनिक बँकेचे संचालक श्रीकांत तोरडमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना तोरडमल म्हणाले की या बँकेचे स्वयंघोषित स्वीकृत संचालक म्हणून बाळासाहेब नरसाळे हे वावरत असुन यांनी केवळ राजकीय वैमनस्यातून कर्जत शाखेत तेवीस लाख रूपयांचा अपहार झाल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांना दिल्या होत्या. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बाळासाहेब नरसाळे हे या बँकेचे फक्त सभासद असून त्यांनी सन २०१६ सालच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी नरसाळे यांनी स्वतंत्र पॅनल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना साधा पूर्ण पॅनल सुद्धा उभा करता आला नव्हता. म्हणजेच त्यांना उमेदवारीसाठी लोकही भेटले नव्हते त्यामुळे नरसाळे यांनी स्वतः अपक्ष निवडणूक लढवली होती. आणि या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि याच नाराजीतून व येणाऱ्या २०२१ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून बाळासाहेब नरसाळे हे कर्जत शाखेत भ्रष्टाचार झाल्याचा केविलवाणा आरोप करत आहेत. पुढे बोलताना तोरडमल म्हणाले की बाळासाहेब नरसाळे हे सैनिक बँकेचे कधीही स्वीकृत संचालक नव्हते व नाहीत परंतु नरसाळे हे जनतेला मी स्वीकृत संचालक असल्याचे भासवत आहेत. असा आरोप  श्रीकांत तोरडमल यांनी पत्रकार परिषदेत केला असून नरसाळे हे वर्तमानपत्रातून खोट्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत असे तोरडमल यांनी सांगितले. तसेच नरसाळे यांनी या पुढे बँकेबाबत जनतेला व वर्तमानपत्राला खोटी माहिती दिल्यास व बँकेचे नुकसान झाल्यास तक्रारदार बाळासाहेब नरसाळे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती  श्रीकांत तोरडमल यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली. 

- कर्जत येथील  सैनिक बँकेच्या शाखेत इतर सर्व शाखें पेक्षा  सर्वात जास्त ठेवी आहेत. याचाच अर्थ कर्जत तालुक्यातील जनतेचा या शाखेवर पूर्ण विश्वास असून ही शाखा सर्व जनतेच्या विश्वासास पात्र असल्याचे यातून सिद्ध होत आहे  - सदाशिव फरांडे. शाखाधिकारी 

 - कर्जत येथील सैनिक बँकेत सामान्य जनतेला अतिशय चांगली सेवा व वागणूक दिली जाते. आणि तक्रारदार नरसाळे हे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत तरी त्यांचे सभासदत्व रद्द करावे तसेच कर्जतच्या शाखेत तेवीस लाखांचा अपहार झाल्याचा अहवाल बाळासाहेब नरसाळे यांनी सादर करावा अन्यथा बँकेच्या सभासदत्व पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News