दरोड्यातील 7 वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक


दरोड्यातील 7 वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

शिक्रापूर येथील दरोडयाचे गुन्हयातील ७  वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात  पुणे ग्रामीण एलसीबी पथकाला यश,पथकाची कौतुकास्पद कामगिरी

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी: सणसवाडी, पुणे-नगर रोड, एल अँड टी फाटा,  ता.शिरूर जि.पुणे येथे सळईच्या ट्रकवर टाकलेल्या दरोडा प्रकरणातील ७ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोरेगाव-भीमा येथून जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

     दिनांक ८ सप्टेंबर २०१३ रोजी पहाटे ०५.०० वा.चे सुमारास पुणे-नगर रोड, एल अँड टी फाटा, सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे फिर्यादी संदीप पांडुरंग तातडे रा.सादनी ता.सिल्लोड जि.औरंगाबाद हे त्यांचे ताब्यातील लोखंडी सळईने भरलेला ट्रक घेवून जात असताना त्यांना स्विप्ट कारमध्ये आलेल्या ७ अज्ञात आरोपींनी आडवून हाताने मारहाण करून जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाइल, रोख रक्कम ९०००/- रुपये हिसकावून घेवून लोखंडी सळईने भरलेला ट्रक चोरून पळवून नेला व ट्रकमधील ८,९६० किलो लोखंडी सळया असा एकूण किं रू.३,८६,५१३/- (तीन लाख श्याऐंशी हजार पाचशे तेरा) चा माल चोरून रिकामा ट्रक न्हावरा ता.शिरुर येथे सोडुन दिला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी ६ आरोपींना अटक करण्यात आलेली होती. परंतु आरोपी नामे धनंजय काळे राहणार चंदनगर, पुणे हा तेव्हापासून फरारी होता.

     पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे आदेशाने पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे व फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला शिक्रापूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या दरोड्याचे गुन्हयातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी धनंजय बाळासाहेब काळे वय २९ वर्षे रा.आनंद पार्क, चंदननगर, पुणे हा पुणे-नगर रोड, कोरेगाव भिमा ता.शिरूर येथे येणार असल्याची बातमी एका खबऱ्यामार्फत मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपी धनंजय काळे यास ताब्यात घेतलेले आहे. पोलीस पकडतील या भीतीने सदर आरोपी चंदन नगर परिसरात नाव बदलून राहत होता. आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

   सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, शब्बीर पठाण, सचिन घाडगे, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, प्रमोद नवले यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News