हिंदवी ग्रुप निर्मित नवीन स्काय पार्क साईटचे सिनेअभिनेत्री व हिंदवी ग्रुप च्या ब्रँड ॲम्बेसेडर सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे भव्य उद्घाटन संपन्न


हिंदवी ग्रुप निर्मित  नवीन स्काय पार्क साईटचे सिनेअभिनेत्री व हिंदवी ग्रुप च्या ब्रँड ॲम्बेसेडर सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे भव्य उद्घाटन संपन्न

पुणे-हिंदवी ग्रुप निर्मित नवीन स्काय पार्क साईटचे  भव्य उद्घाटन प्रसिद्ध सिने अभिनेत्री व हिंदवी ग्रुप च्या ब्रँड ॲम्बेसेडर सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे करण्यात आले. सिने अभिनेत्री व हिंदवी ग्रुप च्या ब्रँड अँबेसिडर सोनाली कुलकर्णी यांनी बुलेट वरून स्वार होत या कार्यक्रमात एन्ट्री केली. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त नामदेवराव चव्हाण, महाराष्ट्र केसरी महेश मोहोळ, माजी महापौर प्रशांत जगताप, हिंदवी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश रोहिदास मांगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय बोरुडे यांनी केले होते. यावेळी गायिका कविता जवळेकर यांनी आपली सुमधुर गीते सादर केली. हिंदवी ग्रुपचे  व्यवस्थापकीय संचालक दिनेश मांगले यांच्या संकल्पनेतून आंबेगाव बुद्रुक येथील स्काय पार्क हा भव्य प्रकल्प साकारला आहे. पहिल्या पन्नास ग्राहकांपैकी एका भाग्यवान ग्राहकाला एक वन बीएचके फ्लॅट मोफत देण्याची सुवर्णसंधी या हिंदवी ग्रुप तर्फे ठेवण्यात आले आहे. या स्काय पार्क साईट मध्ये वन बीएचके, टू बीएचके फ्लॅट अत्यंत माफक दरात ग्राहकांना बुक करता येणार आहेत. सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज, 24तास महापालिकेची पाणी सुविधा, वास्तुशास्त्राप्रमाणे रचना, बॅटरी बॅकअप व लिफ्टसाठी जनरेटर, सेक्युरिटी कॅबिन, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा,सोसायटी बोर्ड व दरवाजासाठी नेमप्लेट, मंदिर, सीसीटीव्ही कॅमेरा आदी विविध सुविधा या हिंदवी ग्रुपच्या स्काय पार्कच्या साईटमध्ये असणार आहेत. तरी इच्छुक ग्राहकांनी आपल्या हक्काच्या घराच्या स्वप्नांसाठी नक्कीच या स्काय पार्क साईट मध्ये आपला फ्लॅट बुक करण्यास हरकत नाही.तरी इच्छुक घर घेणाऱ्या ग्राहकांनी 98 500051 27 या करा क्रमांकावर बुकिंग करावे असे आवाहन हिंदवी ग्रुप तर्फे केले आहे. 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News