आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन च्या वतीने मोफत व्यसन मुक्ती निवासी शिबिराचे आयोजन


आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन च्या वतीने  मोफत व्यसन मुक्ती निवासी शिबिराचे आयोजन

पुणे: किरकट्वाडी येथील आत्मनिर्माण सोशल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने युवक कल्याणार्थ मोफत पाच दिवसीय निवासी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन दिनांक 26 ते 30 ऑगस्ट 2021रोजी करण्यात आले आहे.

संस्थेने आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून पाच दिवसीय मोफत निवासी व्यसनमुक्ती मुक्ती शिबिराचे आयोजन केले असून. या शिबिरामध्ये नर्स, डॉक्टर ,समुपदेशक यांचे मार्गदर्शन होणार आहे. या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेचे संस्थापक सुभाष हगवणे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये दिली .

 या पत्रकार परिषदेला लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश गायकवाड ,व विवेक कदम उपस्थित होते. सुभाष हगवणे म्हणाले,आजच्या स्पर्धेच्या ताणतणावाच्या काळात देशातील युवा पिढी मोठ्याप्रमाणावर व्यसन धीन तेकडे वाढत असल्याचे जाणवले. युवा पिढी हीच खरी राष्ट्रशक्ती  असल्याने देशाचे नुकसान होते. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची स्थापना झाली आहे. अत्यावधीमधेच या केंद्राने अनेक तरुणांना व्यसनातून मुक्त करून  पुनर्वसन केलेले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News