बातमी - चिपळूण पुरग्रस्तांसाठी आर्थिक स्वरुपात व घरगुती साहित्यांच्या स्वरुपात मदत ॲड. संजय सावंत पाटील - जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी यांच्या उपस्थितीत केली.


बातमी - चिपळूण पुरग्रस्तांसाठी आर्थिक स्वरुपात व घरगुती साहित्यांच्या स्वरुपात मदत ॲड. संजय सावंत पाटील - जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी यांच्या उपस्थितीत केली.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेल्या चिपळूण पुरग्रस्तांसाठी आर्थिक स्वरुपात व साहित्यांच्या स्वरुपात विविध माध्यमातुन आपण केलेली मदत ही लाख मोलाची होती सर्व पदाधिकारी व ॲड.आघाव यांचे ह्रदयस्पर्शी ॲड. संजय सावंत जिल्हाध्यक्ष - भाजपा पुणे जिल्हा कायदा आघाडी यांनी मनःपुर्वक आभार मानले.भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कायदा आघाडी, स्वाभिमानी संघर्ष सेना, आम्ही पुणेकर ढोल लेझीम पथक, पुणे नवेदीत हितगुज वकील मंच, पुणे भाजपा यांच्या संयुक्त प्रयत्नाने चिपळुन येथील पुरग्रत जनतेला एक हात मदतीचा करण्यात आला.


चिपळून भागातील लोकांचे खुप मोठे दैनंदिन व आर्थिक नुकसान  झाले. बाजारपेठा सुध्दा उध्वस्त झाल्या. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तसेच शंकरवाडी गावाच्या चौकात थांबून मदत करण्यात आली. यावेळी उपस्थिता पैकी भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील, भाजपा कायदा आघाडी जिल्हा सहसचिव ॲड. शिवशंकर आघाव, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ सांगळे, विजय बढे, भैया खंदारे, वैजनाथ गुट्टे, अमित शर्मा, विनायक पाटेकर, ढोल ताशा संचालक संकेत साळवी, बाळासाहेब खंदारे, पारस भोंडे, ऋषिकेश कांबळे,अथर्व कांबळे,पियुष खडके,सुकन्या अंचन, हर्षदा थावरे, उज्वला ताई कुंभार, स्वाभिमानी संघर्ष महिला आघाडी अध्यक्ष भाग्यश्री ताई पवार, आदी मान्यवर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


अनेक कुटुंबीयांचे संसार उधवस्त झाले आहेत अशा वेळी खारीचा वाट म्हणून जीवनावश्यक वस्तू अन्न-धान्य व संसार उपयोगी साहित्य, कपडे, संसार,पुन्हा उभा करण्यासाठी लागणारी भांडी इत्यादी साहित्य घेऊन पुरग्रस्तांना मदतीसाठी पक्ष, संस्था व संघटना धावून गेले. प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाहणी करून नागरिक का सोबत चर्चा करून मनोबल वाढविण्याचा प्रयंत्न व मार्गदर्शन ॲड. संजय सावंत पाटील यांनी केले. राज्य सरकार कडे निश्चित पाठपुरावा करून मदत निधी साठी मागणी करू असे ॲड. संजय सावंत पाटील जिल्हाध्यक्ष - भाजपा पुणे जिल्हा कायदा आघाडी यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News