जुनी गंगा देवी मंदिरा जवळ गतिरोधक बसवावे* - अँड.नितीन पोळ


जुनी गंगा देवी मंदिरा जवळ गतिरोधक बसवावे* - अँड.नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी / राजेंद्र तासकर

कोपरगाव नगर मनमाड रस्त्यावर जुनी गंगा देवी मंदिरा जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे 

        आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहरातून साईबाबा कॉर्नर ते जुनी गंगा देवी असा पालखी रस्ता झालेला असून सदर रस्ता मोहिनीराज नगर येथून जुनी गंगा देवी मंदिराजवळ नगर मनमाड रस्त्याला जाऊन मिळतो मात्र या ठिकाणी कोणतेही गतिरोधक नसल्याने शिर्डी कडुन येणारी वाहने वेगाने येत असतात  त्याच प्रमाणे रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे झुडपे असल्याने समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा मोटार सायकलवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अंदाज येत नाही, अशा परिस्थितीत या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असतात त्यात काहिना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक वाहन चालकांना आपले अवयव गमावण्याची वेळ आलेली आहे  मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने आता पर्यंत किमान *धोकादायक जागा* असा किंवा वाहने सावकाश चालवा असाही बोर्ड लावलेला  नाही रस्ते बांधणी करताना धोकादायक जागा लक्षात घेऊन असे बोर्ड लावणे आवश्यक असते मात्र अशा प्रकारे कोणतीच काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतलेली दिसत नाही.

       मागील काही दिवसांपूर्वी पुणतांबा चौफुली येथे कायम होणाऱ्या अपघाताबाबत व त्यात निष्पाप नागरिकांना नाहक जीव गमवावे लागले आहेत मात्र त्या ठिकाणी देखील दिशा दर्शक फलक व स्पीड ब्रेकर लवकरात -लवकर बांधकाम विभागाने  बसवावे अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News