डॉ.संजय सावंत यांना देवदूत पुरस्कार प्रदान


डॉ.संजय सावंत यांना देवदूत पुरस्कार प्रदान

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) मुर्टी (ता.बारामती) येथील डॉ.संजय सावंत यांना यशवंत प्रतिष्ठान व स्वर्गीय विद्याताई चाचर फाउंडेशनतर्फे रविवार दि. १५ ऑगस्ट रोजी देवदूत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

   वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात तसेच कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. सावंत यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन देवदूत पुरस्कार देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

      याप्रसंगी मावडीच्या सरपंच सोनाली चाचर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटराव जगताप, कार्याध्यक्ष दीपक चाचर, माजी सरपंच अमोल चाचर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब नलावडे, सुभेदार मेजर, परशुराम शिंदे, संभाजी देशमुख, चंद्रकांत भामे, देवदूत पुरस्कार मिळालेले सत्कारमूर्ती संतोष देशमुख, अवर सचिव वैद्यकीय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन दिलीप भामे, बाप्पा चाचर, इंदू फार्माचे संस्थापक डॉ. रामदास कुटे, मोनाली कुटे, आकाश महाराज कामठे, शरद साळुंखे, निलेश शेलार, तानाजी राजपुरे, छबन राजपुरे, रामदास तांबे, साळुंखे भाऊसाहेब, डॉ. श्वेता बोऱ्हाडे, डॉ.संकेत सावंत, नीता सावंत, रज्जाक शेख, विद्यालयाचा स्टाफ व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News