कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस व पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण.


कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस व पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण.

कर्जत प्रतिनिधी - दिनांक १६ आॅगष्ट रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या  दर्शनी भागात पत्रकार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस कर्मचारी तसेच थेरगाव ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या  सहभागातून पोलीस स्टेशनच्या समोरील बाजूस मेन रोड लगत झाडे लावण्यात आली. कर्जत तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायतीने 2021- 22 या चालू वर्षी माझी वसुंधरा अभियानात भाग घेतलेला असून थेरगाव ग्रामपंचायत च्या वतीने थेरगाव सह तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयासमोर झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला असून या अभियानाअंतर्गत कर्जत पोलिस स्टेशन समोर कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुचविल्याप्रमाणे थेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशन समोरील दर्शनी भागात विविध प्रकारच्या चाळीस झाडांचे रोपण  पत्रकार व पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे , पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, पत्रकार संघाचे सचिव निलेश दिवटे, खजिनदार मुन्ना पठाण, सल्लागार मच्छिंद्र अनारसे, जेष्ठ पत्रकार सुभाष माळवे, अफरोज पठाण तसेच थेरगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शरद कवडे, पोलीस पाटील 

ईश्वर जोगदंड, सरपंच रवींद्र महारनवर, रामा शिंदे उपसरपंच विठ्ठल ननवरे, बाळासाहेब महारनवर, मिनीनाथ शिंदे, तात्याभाऊ महारनवर आणि थेरगाव येथील ग्रामस्थांच्या हस्ते पण यावेळी वृक्षारोपण करण्यात आले . 

        सदर झाडे पोलीस प्रशासन व पत्रकार आणि थेरगाव ग्रामस्थ यांच्या हस्ते लावण्यात आले असून सदर झाडांमुळे पोलीस स्टेशनचा परिसर अधिक शोभून दिसणार असल्याची भावना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल जाधव त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . थेरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड करण्यास मदत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या वतीने थेरगावच्या  ग्रामस्थां साठी अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली व थेरगाव ग्रामस्तांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News