अश्पाक पटेल कन्सल्टिंगचे उद्घाटन रुग्णसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा : मुश्ताक पटेल


अश्पाक पटेल कन्सल्टिंगचे उद्घाटन रुग्णसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा : मुश्ताक पटेल

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काही वर्षे रुग्णसेवा केल्याने त्याचा अनुभव लक्षात घेता नगरमधील क्लिनिकमध्ये शहरासह तालुक्यातील रुग्णांना निश्‍चितच लाभ मिळेल, असा विश्‍वास मुश्ताक पटेल यांनी व्यक्त केला.

स्टेशन रोडवरील कॅफे फरहतशेजारी डॉ. अश्पाक पटेल (एमबीबीएस, एमडी) क्लिनिकचे उद्घाटन डॉ. पटेल यांचे वडील मुश्ताक पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पटेल यांनी वरील विश्‍वास व्यक्त केला. 

कोठी, सारसनगर, जामखेड रोड व शहरातील रुग्णांना डॉ. पटेल यांच्या क्लिनिकचा निश्‍चितच फायदा होईल, असे गौरवोद्गार पटेल यांनी काढले. याप्रसंगी डॉ. बी. बी. जैनब, डॉ. एम. के. शेख, मेहमूद शेख सर, इंजि. शेख अख्तर, आर्किटेक्ट आमेर अख्तर आदि उपस्थित होते.

शुभारंभ कार्यक्रमास डॉ. इम्रान शेख, डॉ. तांबोळी, डॉ. रिजवान अहमद, नफीस चुडिवाला, रफीक मुन्शी, शेख खलील यासीन चौधरी, शफी जहागीरदार, अनिस अहमद यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

स्टेशनरोड, कॅफे फरहतशेजारी डॉ. अश्पाक शेख यांच्या कन्सल्टिंग रुमचे उद्घाटन करताना मुश्ताक पटेल. समवेत डॉ. बी. बी. जैनब, डॉ. एम. के. शेख, शहनाज पटेल, डॉ. अश्पाक पटेल आदि. (छाया : सरवर तांबटकर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News