पुष्पा जगताप सासवड नगरपालिका उपनगराध्यक्षपदी बिनविरोध तर स्वीकृत नगरसेवकपदी सागर जगताप व संदीप राऊत यांची निवड


पुष्पा जगताप सासवड नगरपालिका उपनगराध्यक्षपदी बिनविरोध तर स्वीकृत नगरसेवकपदी सागर जगताप व संदीप राऊत यांची  निवड

सासवड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणुक १६ ऑगस्ट रोजी पार पडली,उपनगराध्यक्षपदी पुष्पा नंदकुमार जगताप यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी पुष्पा जगताप यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले,तसेच स्वीकृत नगरसेवकपदी सागर दत्तात्रय जगताप व संदीप सावता राऊत या दोघांची बिनविरोध निवड सासवड नगरपालिकेच्या गटनेत्या आनंदीकाकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहीले. तसेच नायब तहसीलदार तथा सासवड नगरपालिकेचे प्रशासक सूर्यकांत पठाडे यांनी काम पाहिले. यावेळी सासवड नगरपालिकेचे नगरसेवक मनोहर जगताप, आनंदीकीकी जगताप, सारिका हिवरकर, विजय वढणे, प्रविण भोंडे, पुष्पा जगताप, अस्मिता रणपिसे, सचिन भोंगळे, मंगल म्हेत्रे, दीपक टकले, विद्या टिळेकर, संदीप जगताप, वसुधा आनंदे, अजित जगताप, सुहास लांडगे, निर्मला जगताप, सीमा भोंगळे,  संजय ग. जगताप, तसेच पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News