पैसे दुप्पट करून देणारे भोंदू बाबांना श्रीगोंदा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत केले मुद्देमालासह अटक


पैसे दुप्पट करून देणारे भोंदू बाबांना श्रीगोंदा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत केले  मुद्देमालासह अटक

श्रीगोंदा अंकुश तुपे प्रतिनिधी

दोन अनोळखी साधुचे वेशातील ईसमांनी पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवुन  4 लाख 50 हजार  रुपयांची विश्वासघात करुन पैसे घेवुन फसवणुक केली  चे फिर्याद दत्‍तात्रेय महादेव शेटे राहणार शिवाजीनगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला     मागील 24 तासापुर्वी  दिली   होती.सदर गुन्ह्याचा तपास पोसई रणजित गट  व त्यांच्या टिमने  कारवाई करून आरोपींना अवघ्या 24 तासात  जेरबंद केले . सदरची घटना श्री गोंदा तालुक्यातील हिरडगाव फाट्यावर घडली होती 

 दि .16आगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा थेऊर ता.हवेली येथील आरोपींनी केला असल्याची बातमी मिळाल्यावरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवुन रवाना केले.त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपी   संतोष साहेबराव देवकर वय 45 वर्षे , अशोक फकीरा चव्हाण वय 45 वर्षे , दोघे , रा.जाधवस्ती , थेऊर , ता.हवेली जि.पुणे यांना थेऊर ता.हवेली जि.पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस केली असाता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन फिर्यादीकडुन साडे चार लाख रुपये घेवुन त्यांची फसवणुक केलेल्या रकमेपैकी संतोष देवकर याचेकडुन 1,70,000 / – रु.व अशोक चव्हाण याचेकडुन 2,05,000 / -रु.तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल तिचा आर.टी.ओ.नं.एम.एम .12 BQ5529 अशी 25,000 / रु.किंमतीची व आरोपींचे गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल किंमत अंदाजे 2,000 / – रुपयांचे असा एकुण 4,02,000 / – ( चार लाख दोन हजार रुपये ) रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे .


 सदरच्या आरोपी विरुध्द जुन्नर पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण गु.रजि.नं .42 / 2018 भा.द.वि.क , 454,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदरचे आरोपी हे लोकांना औषधी वनस्पती , ऋद्राक्ष विक्री करण्याचा व भिक्षा मागण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन करुन जवळीक साधतात.त्यानंतर विश्वास संपादन झाल्यानंतर लोकांकडुन आर्थिक अडचण असणारे , कर्जबाजारी असणा – यांची संभाषणातुन माहीती काढतात त्यानंतर आम्ही पैसे दुप्पट करुन देतो असे आमिष दाखवुन आपल्या जाळ्यात ओढतात.व निर्जन ठिकाणी रात्रीचे वेळी पैसे घेवुन बोलावुन फुलावर पैसे ठेवुन हातावर तांदुळ देतात डोळे मिटुन प्रदक्षिणा घालण्यास सांगतात व हातचलाखीने नजर चुकवुन पैसे काढुन घेवुन , फुले एका पिशवित भरुन पिशविचे तोंड बंद करुन वाहनाचे डिक्कीत ठेवण्यास सांगतात . उध्या सकाळ पर्यंत उघडु नका नाहीतर ते खंडीत होईन व पैसे दुप्पट होणार नाही असे म्हणतात पैसे दुप्पट झाल्याचा विश्वास ठेवुन अमिषाला बळी पडलेले लोक हे दुस – या  दिवशी पिशवी उघडुन बघतात त्यावेळी त्यांची फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात येते अशी या आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत आहे .

 त्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी सर्व सामान्य जनतेस अवाहन करण्यात येते की , पैशाचा पाऊस पाडणे , रक्कम दुप्पट करणे , स्वस्थ सोन्याचे अमिष दाखविणे , दागिने पॉलिश करुन देणे , पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने काढणे अशा गुन्ह्यांचे अमिष दाखविणारे लोक निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई रणजित गट , पोका किरण भापकर हे करीत आहेत . सदरची कारवाई     , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब , यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , सपोनि दिलीप तेजनकर , सहा.पो.उप.निरी.अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोकॉ प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकॉ दादा टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली आहे  

, फोटो कप्शन भोंदू बाबांना श्रीगोंदा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तपास लावुन आरोपींना  मुद्देमालासह  पकडले  छाया अंकुश तुपे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News