ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना रोटरी क्लब शिवाजीनगरचे मानद सदस्यपद बहाल.


ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना रोटरी क्लब शिवाजीनगरचे मानद सदस्यपद बहाल.

छायाचित्र :डॉ.मोहन आगाशे यांना सदस्य पिन बहाल करताना मान्यवर.

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांना रो.डॉ.दीपक शिकारपूर माजी प्रांतपाल व रो.मुकुंदराव अभ्यंकर माजी प्रांतपाल यांच्या हस्ते मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले. विद्यार्थी सहाय्यक समितिच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्ष डॉ.शोभा राव,सेक्रेटरी रो.अजय गोडबोले आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.मोहन आगाशे यांनी सर्व लोक चरितार्थासाठी काही काम करतात ते काम त्यांच्या आवडीचे असतेच असे नव्हे मात्र ते काम आवडीने करावे. तसेच सर्व वेळ याच कामात न घालवता आपल्या आवडीची कला जोपासण्यासाठी काही वेळ घालवावा. म्हणजे जीवन सुंदर होते. असे प्रतिपादन केले.  जाहिरात
Search
विडिओ
Recent News