राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परम शिष्य बहुरूपी महाराज यांचा 101 वा वाढदिवस उत्साहात साजरा


राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परम शिष्य बहुरूपी महाराज यांचा 101 वा वाढदिवस उत्साहात साजरा

अहमदनगर प्रतिनिधी ( संजय सावत ) 

नाशिक जिल्हातील लासलगांव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परम शिष्य जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रमाचे अध्यक्ष प . पू . वासुदेवनंदगिरी ( बहुरुपी महाराज ) यांचा वयाचा 101 वा अभिष्टचिंतन सोहळा अनेक तपस्वी सांधू संताच्या उत्साहात नागपंचमीच्या मूहूर्तावर उत्साहात पार पडला . अनाथाचे नाथ बहुरूपी महाराजांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आखाडा परिषदचे अध्यक्ष 1008 महामंडलेश्र्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या सह राज्यातील अनेक साधू संताची उपस्थितीने भाविक मंत्रमुग्ध झाले . लासलगाव येथील शास्त्रीनगर येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे परम शिष्य तथा अनाथांचे नाथ असलेले बहुरूपी महारांजाचा शास्त्रीनगर येथे अनाथ - मुला - मुलीसाठी व विधवा स्त्रियांसाठी अनाथ आश्रम आहे . या अनाथ आश्रमा मध्ये बाबा ज्याला कोणी नाही त्याला बहुरूपी बाबा व त्यांचे धाकले बंधू दिलीप गुंजाळसर वर अनाथांची माय संगीता गुंजाळ दांपत्याने आपला शिक्षकी पेशाला पूर्णविराम देत अर्थात नोकरीवर पाणी सोडत फक्त आपल्या बहुरूपी बाबांनी अनाथ बालकांसाठी सुरु असलेले कार्य अखंडितपणे सुरु राहण्यासाठी आश्रमाची जबाबदारी घेऊन या अनाथ बालकांची सेवा करत अनेक वर्षापासून सेवा करत असल्याने लासलगांव येथील शास्त्रीनगर ही अनाथांचे कुटुंब झाले असून येथेच बहुरूपी बाबा आपला वेळ या अनाथ मुलांसोबत गत अनेक वर्षापासून घालवत असून अनेक देणगीदारांच्या म्हणा की दानशूर व्यक्तीच्या आधारावर हा आश्रम सुरु असून या आश्रमाला शासनाचे कुढले अनुदान नसल्याने जनतेच्या व भाविक भक्तांच्या देणगी वरचं आश्रम सुरु असून बाबा यात कुठेही निराधार अनाथ मुलांना कमी पडून देत नसून निफाड तालुक्यांत नाहीतर राज्यात या आश्रमाचे नाव निघत आहे . अशातच जनतेची या बालकांची सेवा करतांना बाबा एकशे एक वर्षाचे झाले हे निफाड तालुक्यांतील भाविक भक्तांना ही कळले नाही . नागपंचमीच्या शुभ पावन पर्व कालावर बाबांचा जन्म दिवस असल्याने बाबांना शुभेच्छा व दर्शन होण्यासाठी राज्यभरातून कोरोणा चा प्रादुर्भाव असतानाही राज्यभरातून भाविकभक्त लासलगाव शास्त्रीनगर येथे बाबांचा आर्शीवाद व शुभेच्छा  देण्यासाठी येत असतात . आश्रमांच्या कार्या विषयी जाणून घेतले तर आत्तापर्यत ९० निराधार अनाथ मुला - मुलीचे गुंजाळ दांपत्याने लग्न केली असून त्यांना शिकून स्वतःच्या पायावर तयार केले .संध्या या आश्रमांत सत्तर मुली मुले आश्रमांत शिक्षण देऊन स्वतः च्या पायावर तयार करण्यासाठी गुंजाळ दाम्पत्य त्यांना शिक्षणाचे धडे देत असल्याने सर्व गुंजाळ दांपत्याच्या कार्याने भारावून गेले तर दोनशे मुला - मुलींचे  मम्मी - पप्पा असलेले गुंजाळ दांपत्याचा अनेक मान्यवरांनी सत्कार केला . अशा या महान निराधार अनाथांचे कैवारी प . पू . स्वामी वासुदेवनंदगिरी ( बहुरूपी महाराज ) यांना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा . 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News