पुणे महानगरपालिका ,क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान व यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड 19 मोफत लसीकरण शिबिराचे पुण्यात आयोजन संपन्न


पुणे महानगरपालिका ,क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान व यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड 19  मोफत लसीकरण शिबिराचे  पुण्यात आयोजन संपन्न

पुणे-पुणे महानगरपालिका ,क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान व यशस्विनी विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने          कोविड-19 मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन 16 ऑगस्ट 2021रोजी सकाळी 9ते सायंकाळी 5 या कालावधीत पुण्यातील वडगाव खुर्द येथील नारायणराव सणस विद्यालय व  वसंतराव सखाराम सणस ज्युनिअर कॉलेज येथे  करण्यात आले होते .या मोफत लसीकरण शिबिराचे उद्घाटन भारत सरकारचे राष्ट्रीय युवक पुरस्कार सन्मानार्थी व लंडनच्या कॉमनवेल्थ युथ कौन्सिलचे सन्माननीय सदस्य डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिज्योती महिला  प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व  यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यशस्विनी विकास माध्यमातून सुनीता डांगे तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात अग्रेसर आहेत.या  महिन्यात त्यांनी रक्तदान,आरोग्य शिबीर,  पूरग्रस्तांना मदत ,आदिवासी लोकांना अन्नधान्य किट वाटप ,सुवर्णप्राशन शिबीर  घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपत आहे तसेच  हे तिसरे शिबीर  घेऊन 2500 लोकांना लस उपलब्ध करून दिली.कोविड काळात सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले  आहेत.

या प्रसंगी क्रांतिज्योती महिला  प्रतिष्ठानच्या  अध्यक्षा रुपाली चाकणकर ,यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता डांगे, सुहास चाकणकर, मोनिका चाकणकर, दत्ता नाना रायकर, दशरथ मनेरे ,प्रफुल्ल चाकणकर ,राजश्री खिलारे,सविता बेट्टीगिरी ,रुपाली पानसरे ,भागश्री चव्हाण ,शीतल पवार,साक्षी डांगे, डॉली जावलीकर, प्रियंका गुजराती ,छाया शितोळे, बाळकृष्ण डावखर,शिल्पा यादव ,माधवी गोसावी,निलेश चाकणकर, हर्षद माळेकर, स्वप्नील गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .औद्योगिक भागातील सफाई कामगार व माथाडी कामगार जे की सुपर  स्प्रेडर आहेत  त्यांच्यासाठी येथे आयोजित करण्यात आले होते .या शिबिरामध्ये आठशे  लोकांचे लसीकरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वीस हजार लोकांपर्यंत  लसीकरण शिबिराच्या माध्यमातून  पोहोचण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News