सहयोग क्रिडा मंडळाचा खेळाडूंना मोठा आधार - सरपंच संजय इथापे


सहयोग क्रिडा मंडळाचा खेळाडूंना मोठा आधार - सरपंच संजय इथापे

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सहयोग क्रीडा मंडळाच्या खेळाडू निवासस्थान व कार्यालय इमारतीचे भूमिपूजन प्रसंगी सरपंच संजय इथापे, हरिभाऊ इथापे, कबड्डी पंच आबासाहेब इथापे.

श्रीगोंदा-अंकुश तुपे प्रतिनिधी

तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये योग्यता असूनही मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. नवोदीत खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची चांगली कामगीरी होण्यास अधिक मदत होईल. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सहयोग क्रिडा मंडळाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे होत आहे. या क्रिडा मंडळाच्या माध्यमातून खेळाडूंना सरावासाठी अद्ययावत सुविधा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन सरपंच संजय इथापे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सहयोग क्रीडा मंडळ, एरंडोली, ता. श्रीगोंदा येथे खेळाडू निवासस्थान व क्लबच्या कार्यालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी हरिभाऊ इथापे, कबड्डी पंच आबासाहेब इथापे, राष्ट्रीय कबड्डी पंच विजय जठार, किरण नलगे, सचिव निलेश इथापे, प्रा. राजेंद्र इथापे, सतोष इथापे, बाळासाहेब इथापे व खेळाडू उपस्थित होते. 

सहयोग क्रिडा मंडळाच्या उभारणीमुळे दूर्गम भागातील खेळाडूंना विविध खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. या मंडळाच्या माध्यमातून कबड्डी व इतर खेळांमध्ये राज्यपातळीपर्यंत खेळाडूंनी यश प्राप्त केले असल्याचे मंडळाचे संस्थापक आबासाहेब इथापे यांनी सांगितले.   


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News