श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने वृद्धाश्रमात केला स्वातंत्र्यदिन साजरा.


श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने वृद्धाश्रमात केला स्वातंत्र्यदिन साजरा.

परमपूज्य संत गगनगिरी महाराज यांचे शिष्य आबानंदगिरी महाराज यांनी दिले श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेला आशीर्वाद व शुभेच्छा.

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, जनसेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरणच्या माध्यमातून रविवार दिनांक 15/8/2021रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पनवेल नावडे येथील परमशांतीधाम वृद्धाश्रमात सकाळी 10 वाजता जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.ज्यांचे या जगात कोणीच नाही असे व्यक्ती,रस्त्यावर फिरणारे साधु संत, फकीर, अपंग बांधव, अनोळखी व्यक्ती अश्या व्यक्तींना येथे आधार दिला जातो. अश्या व्यक्तींच्या सुख दुःखात सहभागी होत, त्यांच्या भावना जाणून घेत त्यांना अन्नधान्य,वस्तू, साहित्य रूपात मदत करण्यात आली .फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत या आश्रमाला श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली .

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष पत्रकार विठ्ठल ममताबादे,सल्लागार -ॲड गुरुनाथ भगत, सचिव-प्रेम म्हात्रे,संपर्क प्रमुख ओमकार म्हात्रे, पंकज शर्मा (आर्मी लव्हर ), गणेश म्हात्रे,हेमंत ठाकूर ,साहिल म्हात्रे,सचिन म्हात्रे,आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

धार्मिक क्षेत्रातील संत परमपूज्य गगनगिरी महाराजांचे शिष्य आबानंदगिरी महाराज यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.परमशांतीधाम वृद्धाश्रमाचे कर्मचारी संजय सकपाळ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News