अनाधिकृतपणे १७० मीटरची रस्त्याची खोदाई


अनाधिकृतपणे १७० मीटरची रस्त्याची खोदाई

*(नळ स्टॅाप येथील प्रभाग १३ मधील घटना)*

    पुण्यातील नळ स्टॉप याठिकाणी प्रभाग क्रमांक १३ येथे केबल टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे १७० मीटरची खोदाई केली केलेल्याचा प्रकार समोर आला आहे. टाटा टेलि सर्व्हिसेसच्या वतीने सनलाईट नेटवर्क कंपनीमध्ये कार्यरत असलेले कंत्राटदार देवा राठोड व त्यांच्या कामगारांनी बेजाबदारपणे सदरील खोदाई केली आहे.   सदरील कंपनीने पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि महानगरपालिकेचे झालेले नुकसान दंडासह भरून घ्यावे. अशी मागणी सनी निम्हण यांनी पत्रकाद्वारे मुख्य अभियंता पथ विभाग सविता पाटील पुणे महानगरपालिका यांच्याकडे केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News