स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवभारत मानवतावादी संस्थेतर्फे समाजोपयोगी उपक्रम


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवभारत मानवतावादी संस्थेतर्फे समाजोपयोगी  उपक्रम

ससून रुग्णालयाचे  अधिष्ठाता,डाॅ.मुरलीधर तांबे यांचा सत्कार करताना प्रकाश भिलारे

पुणे :स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवभारत मानवतावादी संस्थेतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते.अध्यक्ष प्रकाश भिलारे आणि पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.यामध्ये पूरग्रस्तांना मदत,धान्यवाटप ,गरजुंना शालेय साहित्य वाटप,अनाथ मुलांना धान्यवाटप ,कोरोना योध्यांचा सत्कार ,रक्तदान ,शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान अशा उपक्रमांचा समावेश होता. 


अतिदुर्गम भागातील जोरवाडी येथील 15 कुटुंबातील पूरग्रस्ताना मदत  मोकाशी गुरूजी व पवार गुरूजी यांच्या सहकार्याने करण्यात आली.गुळूंब हायस्कूल, केंजळ हायस्कूल येथे गरजू , होतकरू मुलांना शालेय साहित्य वाटप सौ.धेढे,अकबर मोकाशी, संतोष भांदिर्गे , जितेंद्र  भिलारे  यांच्या सहकार्याने करण्यात आले. 


 सोफोश,ससून सर्वोपचार रूग्णालय, पुणे येथील अनाथ मुलांसाठी धान्य  देण्यात आले. बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे  अधिष्ठाता डाॅ.मुरलीधर तांबे,मुख्य प्रशासकीय अधिकारी  गणेश बडदरे, प्रशासकीय अधिकारी सुरेश बोनावळे,डॉक्टर्स  व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा कोरोना महामारीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.कोरोना योध्दयांचा तसेच  शहिदांच्या कुटुंबियांचा सत्कार  नवभारत मानवतावादी संस्था व शासकीय  पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना यांच्या वतीने काकडे,पवार,थोपटे,मारकड  यांच्याहस्ते केला गेला.या निमित्ताने सदस्यांनी रक्तदान केले
जाहिरात
Search
विडिओ
Recent News