महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने डॉ तोफिक यांना कोरोना योद्धा सन्मानित करण्यात आले


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने डॉ तोफिक यांना कोरोना योद्धा सन्मानित करण्यात आले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तौफिक शेख यांनी कोरोना काळात केलेली रूग्णसेवा व आपल्या जिवाची परवाह न करता घेतलेले अथक परिश्रम याचा आढावा घेता महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने त्यांना कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले याच बरोबर कोल्हार येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री राजमोहंमद शेख यांची कन्या कुमारी करिष्मा राजमोहंमद शेख हिने इलेक्ट्रॉनिक व टेलीकम्युनिकेशन च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करून 94.20 % मार्क मिळवून टॉपर ची जागा राखली असल्याने पत्रकार संघाच्या वतीने या विद्यार्थिनीचा सत्कार करून गौरव करण्यात आला दिनांक 14-08- 2021 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

    या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली हे होते. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे प्रदेश महासचिव शेख फकीरमोहंमद, प्रदेश उपाध्यक्ष बी.के.सौदागर पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जहागीरदार इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजमोहंमद शेख

यांनी केले तर प्रास्ताविक अमीर भाई अमीर भाई जहागिरदार यांनी केले या कार्यक्रमात डॉक्टर तोफिक यांना शेख बरकत अली यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले तर कुमारी करिष्मा राजमोहंमद शेख या विद्यार्थिनीचा सत्कार शेख यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख बरकत अली म्हणाले की कोरोना काळात ज्या लोकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेतले आहे अशा लोकांचा शोध घेऊन त्यांचा उत्साह वाढविण्याकरिता त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून सन्मानपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. पत्रकार संघाने नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे दैनिक सार्वमत चे संपादक स्वर्गीय वसंतरावजी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पत्रकार संघाच्या वतीने खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या असामान्य प्रवृत्तीच्या व्यक्तीची निवड करून त्यास समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पत्रकार संघ हा पत्रकारांचा सुरक्षाकवच आहे कोणत्याही पत्रकारावर हल्ला झाल्यास अगर पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल झाल्यास पत्रकार संघ त्या पत्रकाराला न्याय मिळवून देणे कामी मदतीचा हात पुढे करतो तसेच पत्रकारांच्या मागण्या व अडीअडचणी सोडविण्यास पत्रकार संघ सक्षम असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकार संघाच्या शाखा पसरल्या आहेत पत्रकार संघाचे सर्व सदस्य व पदाधिकारी संघाचे काम उत्कृष्ट रीत्या पार पाडत असल्याचे शेख यांनी सांगितले डॉक्टर तोफिक यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की आपण कोरोना काळात निस्वार्थीपणे काम केले आहे. या काळात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली होती या रुग्णांचे प्राण वाचविणे करीत आपण 24 तास सेवा केली आहे.कोरोना च्या दुसऱ्या लाटेच्या वेळेस अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली.  कोविड सेंटर व रुग्णालयातील कॉट पूर्णपणे भरल्या होत्या नवीन रुग्णांनाला दाखल करण्यास जागा शिल्लक नव्हती त्यात पुन्हा ऑक्सीजन चा मोठा तुटवडा झाल्याने रुग्णांना वाचविणे करिता तारेवरची कसरत करावी लागली माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांनी कोरोना काळात परिश्रम घेतले पत्रकार संघाने माझ्या कामाचा आढावा घेत मला कोरोना योद्धा हे मानपत्र प्रदान करून माझा गुणगौरव केला आहे याबद्दल मी पत्रकार संघाचा ऋणी आहे पुढील काळातही माझी सेवा याच पद्धतीने चालू राहील रुग्णसेवेत मला प्रसन्नता व समाधान वाटते असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमास पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुभाष राव गायकवाड, तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख,तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज भाई पठाण,बेलापूर शहराध्यक्ष एजाज भाई सय्यद, बेलापूर शहर संघटक मुसा भाई सय्यद, बेलापूर शहर उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, अरुण त्रिभुवन, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद भाई शेख, अकबर भाई शेख,अमीर बेग मिर्झा, सलीम दस्तगीर आदी पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार बी.के. सौदागर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News