माळवाडी ग्रामविकास फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न


माळवाडी ग्रामविकास फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण अभियान संपन्न

केडगाव : माळवाडी ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ फाउंडेशनच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दौंड तालुक्यातील माळवाडी येथे वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी आजीमाजी सरपंच, उपसरपंच व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त माळवाडी ग्रामस्थ, तरूण मंडळ उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शितोळे यांनी जेसीबी व वृक्ष इ. चे सहकार्य केले. तसेच पुरंदर नागरी पतसंस्था यवतचे शाखाप्रमुख सुनिल शितोळे,  ग्रामपंचायत सदस्या जयश्री कुदळे, माजी उपसरपंच भाऊसो बारवकर यांनी रोख स्वरूपात आर्थिक मदत केली. तर ग्रामपंचायत सदस्या शुभांगी चव्हाण यांच्याकडुन ठिबकचे साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.

      तसेच फाऊंडेशनचे सदस्य दत्तात्रय बारवकर व माजी SRPF उपनिरीक्षक वसंतराव जगताप यांनी झाडांसाठी पाण्याची सोय करून दिली. यावेळी दौंड शिवसेना तालुकाध्यक्ष विजयसिंह चव्हाण यांनी पुढील वृक्षारोपणासाठी  कुंपन देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपणासाठी ज्यानी सहकार्य केले व जे मान्यवर आवर्जून उपस्थित राहीले त्या सर्वांचे माळवाडी ग्रामविकास फाऊंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News