मा.आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या तर्फे व उद्योग आघाडीच्या साहाय्याने रोजगार संधी.


मा.आमदार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या तर्फे व उद्योग आघाडीच्या साहाय्याने रोजगार संधी.

छायाचित्र :मा.चंद्रकांत दादा पाटील वाटप करताना

भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे वतीने “भाजप रोजगार संधीची कर्तव्य पूर्ती” योजने अंतर्गत ३१ नागरिकांना  १ महिना रोजगार मानधन व महिन्याचे किराणा किट मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते वाटण्यात आले. मा.चंद्रकांतदादा  पाटील यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ,उद्योग आघाडी अध्यक्ष अमृता देवगावकर,उपाध्यक्ष संतोष परदेशी,सरचिटणीस रामदास गावडे,कोथरूड मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी,मंदार देवगावकर आदी मान्यवरांच्या बरोबर पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. अमृता देवगावकर यांनी योजनेची सविस्तर माहिती सांगितली. या प्रसंगी बोलताना मा.चंद्रकांतदादा  पाटील यांनी नागरिक स्वाभिमानी असतात,अनेक लोकांना मदत नको तर काम हवे असते. व यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News