महाविकास आघाडीच्या वतीने लक्ष्मीनगर भागामध्ये 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिक यांचा सत्कार


महाविकास आघाडीच्या वतीने  लक्ष्मीनगर भागामध्ये 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिक यांचा सत्कार

पुणे:75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने  आज लक्ष्मीनगर भागामध्ये 75 वर्षाच्या जेष्ठ नागरिक यांचा सत्कार , लहान मुलांना खाऊ वाटप करून द्वाजरोह करण्यात आले कार्यक्रम ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करून करण्यात आली .कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ शिवसैनिक दिलीप पोमन व शिवसेना शाखा प्रमुख दिनेश पोटे यांनी केले .यावेळी भागातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पर्वती युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुजित लाजूरकर यांनी आभार मानले तसेच ते म्हणाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून आज 75 वर्षे पूर्ण झाली तरीही तेव्हा जसे इंग्रजांनी हुकूम शाही करत सर्व भारतीयांना गुलाम बनवले होते तसेच आज भाजपा सरकार कडून सामान्य जनतेला व जनते साठी लढणाऱ्या समाज सेवकांना हिटलर शाही पद्धतीने गुलाम केले जात आहे त्यांच्यावर हुकूमशाही लादली जात आहे त्या काळात जसे स्वातंत्र सैनिक लढले तसा आपल्याला ह्या भाजप सरकार बरोबर लढा देऊन सामान्य जनतेला ह्या भाजप सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त करायचे आहे त्या साठी आपण सगळे एकत्र आलो पाहिजे त्यांना भारत देशातून हाकलून लावले पाहिजे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिले तरच खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतंत्र मिळाले असे म्हणावे लागेल.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News