जनकल्याण रक्तपेढीने कोव्हिडच्या काळात रक्तदान व प्लाझ्मा पुरवठा करून केली जनसेवा - रघुनाथ ढोक!! 75 व्या स्वातंत्र्य दिनी 77 जणांनी केले रक्तदान


जनकल्याण रक्तपेढीने  कोव्हिडच्या काळात रक्तदान व प्लाझ्मा पुरवठा करून केली जनसेवा - रघुनाथ ढोक!! 75 व्या स्वातंत्र्य दिनी 77 जणांनी केले रक्तदान

मिलिंद शेंडगे विशेष प्रतिनिधी

पुणे : भारत विकास परिषद स्वारगेट शाखा व सौ. सुशिलाबेन मोतीलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिर यावर्षी देखील भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  15 ऑगस्ट रोजी जनकल्याण रक्त पेढी, पुणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत आयोजित केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याणचे डॉ. अतुल कुलकर्णी, राजेंद्र लुंकड, निवृत्त ACP माधव  चिरमे, पृथ्वीराज धोखा, रतन माळी, प्रकाश सोळंकी, गोरख थोरात, विठ्ठल काटे, रेखा आखाडे, कोकिळाबेन शेठ, वासुदेव केंच, दीपक गुंदेचा आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे शुभहस्ते भारतमातेचे पुजन केले .

     यावेळी जनकल्याण रक्तपेढीला आधुनिक काळानुरूप रक्त, लघवी, थुंकी तपासणी यंत्र मधुकर गिरमे व मोतीलाल  शाह यांच्यातर्फे भेट देण्यात आले. यावेळी या मशीनची उपयुक्तता व रक्तदानाची सध्या किती गरज आहे याविषयी मौलिक माहिती डॉ.अतुल कुलकर्णी यांनी देऊन गावोगावी जाऊन शिबिर घेण्यासाठी दानशूर व्यक्तीची गरज आहे असे देखील म्हटले. यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की कोव्हिडच्या  पहिल्या व दुसऱ्या लाटेत जनकल्याण  रक्तपेढीने जनसेवा म्हणून अल्प किंमतीत लोकांना मुबलक रक्तपुरवठा तसेच प्लाझ्मा उपलब्ध करून चांगली सेवा दिली. याबद्दल जनकल्याण रक्तपेढीचे अभिनंदन करून ढोक पुढे  म्हणाले की, आजही आपल्या भारताला रक्तदान करणारे तरुण पिढीची जास्त गरज आहे त्यासाठी गावोगावी जनजागृती होणे गरजेचे आहे.

    याप्रसंगी तरुण पिढीतील ऋतुजा औटी, वैभव गायकवाड, निखिल कदम यांनी प्रथमच रक्तदान केले तर नेहमीप्रमाणे सत्यशोधक रघुनाथ ढोक, युवराज सावंत व महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून 77 रक्तदात्यांनी श्रेष्ठदान म्हणून रक्तदान केले. या सर्वांना गौरव पत्र, मास्क, पेन व फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनतर्फे रक्तदाते व जनकल्याण रक्तपेढीच्या महिला कर्मचारी यांना महात्मा फुले गीत चरीत्र व थोर ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ भेट दिले. तर मोतीलाल शाह यांनी रतन माळी यांच्या घरटे प्रकल्पाला 5 हजार रुपयांचा धनादेश सुशिलाबेन शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिले आणि फुले एज्युकेशनला साउंड सिस्टीम भेट दिली. यावेळी सुशीलबेन शाह आणि कोकिळाबेन शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा भारत विकास परिषद, स्वारगेट तर्फे पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत विकास परिषदेचे चंद्रकात दर्डा, श्रेणीक शाह, आकाश ढोक, सुनील शाह, नाथाभाऊ माळी, अमित शेठीया, जनकल्याणचे संतोष अंगुळकर, स्वाती एडके व सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक अतुल सलागरे, सूत्रसंचालन शैलेश शाह व आभार मनोज शाह यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News