कॅरम खेळामधील एकाग्रतेमुळे बुद्धिमत्ता वाढीला चालना मिळते - सचिन घुले


कॅरम खेळामधील  एकाग्रतेमुळे बुद्धिमत्ता वाढीला चालना मिळते - सचिन घुले

खास वयोगट ६ ते २१ मुलांमुलीसाठी आणि महिला वर्ग, ज्येष्ठ खेळाडू साठी पुण्यातील उँड्री येथे मास्टरस्ट्रोक कॅरम  कॅरम अकॅडमीस  प्रारंभ
पुणे - कॅरम खेळातील एकाग्रतेळे बुद्धिमत्तेला चालना मिळते.त्यामुळे कॅरम  खेळामध्ये  जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे ,असे मत  हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष व हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले यांनी व्यक्त केले 

पुण्याचे उपनगर असलेल्या फ्युजन स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लब, उन्ड्री महालक्ष्मी ग्रुप च्या पाठीमागे, बिशप स्कूल समोर येथे खास महिला वर्गासाठी आणि मुलांमुलीनंसाठी मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमीस प्रारंभ झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व मुळशी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले व  कॅरमचे महागुरु, भारतीय कॅरम संघाचे प्रशिक्षक ज्येष्ठ खेळाडू सुहास कांबळी यांनी स्ट्रायकर ने मांडणी फोडून मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी सुरू झाल्याची घोषणा केली.  

या प्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शेठ घुले व फ्युजन स्पोर्ट्स अँड फिटनेस क्लबचे संस्थापक क्षितिज घुले, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते व  आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रकाश गायकवाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजीत त्रीपणकर, राष्ट्रीय कॅरम खेळाडू मेधा मठकरी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सदस्य आशुतोष धोडमिसे, आई. सी.एफ. कप फेडरेशन पॅनल अंपायर संदीप अडागळे अकादमी चे संचालक गणेश अडागळे, आणि संचालिका आशा भोसले राष्ट्रीय बॉक्सिंग पंच व क्रीडापटू वैशाली चिपलकट्टी, पुणे महानगपालिका कॅरम संघ व्यवस्थापक माऊली पाटोळे उपस्थित होते.

सचिन घुले पुढे म्हणाले की,उन्ड्री व आसपासच्या परिसरमध्ये कॅरम सोडून इतर सर्व क्रीडा प्रकार उपलब्ध आहेत आता कॅरम अकॅडमी सुरू झाल्या मुळे या खेळात रुची असणाऱ्या लोकांना अकॅडमी चा लाभ घेता येईल.या कॅरम अकॅडमीचा फायदा लहान मुले व कॅरम खेळणारे तज्ञ खेळाडू यांना पुढील स्पर्धेत भाग घेण्यासाठी नक्की होणार आहे.या मास्टरस्ट्रोक कॅरम अकादमीच्या  पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहू  व या अकॅडमीचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार करून जास्तीत जास्त मुले कसे प्रशिक्षण घेतील याचीदेखील काळजी आम्ही घेवू असे आश्वासन सचिन घुले यांनी दिले.

              सुहास कांबळी यावेळी  म्हणाले की, पूर्वी दळणवळणाची यंत्रणा आत्ता सारखी नव्हती तसेच मुंबई सारख्या दमट हवामान असलेल्या ठिकाणी सुद्धा अतिशय अल्प सुखसुविधा असलेल्या क्रीडा संस्था मधून आम्ही त्या वेळी तासनतास एकाग्रतेने सराव करायचो. आत्ता परिस्थिती बदलली आहे. अत्याधुनिक सुविधा असलेल्या क्रीडा अकदमींचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे. एकाग्रता वाढवणाऱ्या या खेळात चांगले खेळाडू तयार झाले पाहिजेत. पूर्वी आमच्या वेळेला स्पर्धा सुरू होण्या पूर्वी "वॉर्म अप" साठी स्पर्धकांना पुरेसा वेळ दिला जायचा त्या मुळे मानसिक तयारी व्हायची आणि स्पर्धेसाठी आवश्यक असणारी तग धरण्याची क्षमता वाढण्यास मदत व्हायची. आत्ता सगळ्या स्तरावरील  कॅरम स्पर्धांमधे स्पर्धकांना थेट उतरवले जाते असे मत त्यांनी व्यक्त केले. कॅरम या खेळाकडे मनोरंजन किंवा विरंगुळा या दृष्टीने न पाहता एक उत्तम व्यावसायिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

वैशाली चीपलकट्टी यावेळी म्हणाल्या की

आत्तापर्यंत महिलांसाठी कोणतीही कॅरम अकॅडमी पुण्यात उपलब्ध नव्हती त्यामुळे मास्टर स्ट्रोक कॅरम अकादमीच्या  माध्यमातून कॅरम खेळण्यासाठी  महिलांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळे महिला व मुलींनी कॅरम खेळण्यासाठी नक्की या अकॅडमीचे मार्गदर्शन घ्यावे.

आपल्या भाषणात मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमीचे संचालक गणेश अडागळे म्हणाले की, महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक आणि मुले मुली या अँकॅडमी मध्ये येऊन खेळू शकतात. पण याच बरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून जर या खेळाला स्वीकारायचे असेल तर अकॅडमी मध्ये ६ ते २१ वयोगटातील मुला मुलींना खास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

संदीप  अडागळे म्हणाले की कॅरम या खेळामध्ये सुद्धा आंतरशालेय ,जिल्हास्तरीय,

झोनल स्पर्धा, आंतरजिल्हा, आयपीएल सारखी सी.पी. एल. लीग, आंतरराज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्विस लीग,  आय सी एफ लीग, आदी प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या साठी अकॅडमी मधून  खेळतानाची आसन स्थिती पासून ते हातात स्ट्रायकर पकडण्या पर्यंतचे सर्व  मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले व भारतीय कॅरम संघटनेचे खजिनदार अरूण  केदार यांच्या मार्गदर्शनाने काम चालू आहे असल्याचे संदीप अडागळे यांनी सांगितले. 


क्रिकेट सारख्या खेळाला जसा नावलौकिक मिळाला आहे तसा कॅरम हा खेळ अजूनही भारतात दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या कॅरम खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत असा मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी चा उद्देश आहे. या वास्तू मधेच व्हीजन कॅफे उपहारगृह सुरू झाले असून यामध्ये  खास खेळाडूंच्या आरोग्य व आहाराचा विचार करून पौष्टिक आणि सकस आहार उपलब्ध केले जाणार आहेत.स्पोर्टस झोनवर खेळायला येणाऱ्या  खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करूनच पौष्टीक आहार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने क्षितिज घुले यांच्या संकल्पनेतून व्हीजन कॅफे उपहारगृह सुरू करण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News