केडगाव येथे ठीकठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा


केडगाव येथे ठीकठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

केडगाव : 75 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त दौंड तालुक्यातील केडगाव येथे ग्रामपंचायत, जिल्हा परीषद शाळा, केडगाव चावडी, आरोग्य केंद्र इ. ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी केडगावचे सरपंच अजित शेलार,  उपसरपंच अशोक हंडाळ, ग्रामपंचायत सदस्य नितिन जगताप, सतिश बारवकर, पोलीस पाटील हनुमंत हंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केडगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्हणून कोरोना तपासणी जास्तीत-जास्त करण्यासाठी वॉर्ड निहाय नियोजन करून केडगाव येथील नागरीकांचे जास्तीत-जास्त लसीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न करण्याचे नियोजन चालु असल्याचे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायतीच्यावतीने सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News