आझादीच्या अमृत महोत्सवा निमित्त कर्जत मधे एन सी सी छात्र सैनिकांची मॅरेथॉन


आझादीच्या अमृत महोत्सवा निमित्त कर्जत मधे एन सी सी  छात्र सैनिकांची मॅरेथॉन

 रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील  एनसीसी छात्र सैनिकांनी आजादी का अमृत महोत्सवानिमित्त फिट इंडिया फ्रीडम रन चे आयोजन कर्नल जीवन झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याची माहिती दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांनी दिली. 

     दिनांक १४ ऑगस्ट २०२१ रोजी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ आमदार रोहित पवार यांनी मॅरेथॉनला हिरवा ध्वज दाखवून शुभेच्छा दिल्या मॅरेथॉन कर्जत अहमदनगर रोडवर तीन किलोमीटरपर्यंत आयोजन केले होते त्यात ७७ छात्र सैनिकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन  मेजर डॉक्टर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते .         

   

    या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे, राजेंद्र फाळके तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस अधीक्षक जाधव साहेब. नगरपंचायतचे मुख्याधिकारी  गोविंद जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अवसरे  कुंडलिक,  काकासाहेब तापकीर,   बळीराम यादव,   मेजर डॉ. संजय चौधरी, प्रा. किसन सूळ प्रा. प्रकाश धांडे व इतर मान्यवर उपस्थित  होते. 

   या मॅरेथॉन बद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, सुभेदार मेजर लंकेदर सिंग , सुभेदार सतेंदर सिंग , गणेश वामन ,शंकर मेना , विलास मोढळे  यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News