पुण्याचा सनी शेडगे बनला मिस्टर ब्रावोकिंग ऑफ हिंदूस्थान २०२१


पुण्याचा सनी शेडगे बनला मिस्टर ब्रावोकिंग ऑफ हिंदूस्थान २०२१

मला दाढीची आवड आहे, आणि त्या दाढी मुळेच मला ही ओळख मिळाली- सनी शेडगे

पुणे : गुजरात येथे संपन्न झालेल्या मिस्टर ब्रावोकिंग ऑफ हिंदूस्थान २०२१ च्या स्पर्धेत पुण्यातील धायरी येथील सनी राजू शेडगे यांनी बाजी मारत स्पर्धेत सर्वोत्तम स्थान मिळवले. गुजरात बीयर्ड क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या शो मध्ये देशातून विविध राज्यांतून ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत स्पर्धकांचे रॉम वॉक, परिचय, प्रश्न उत्तर यांच्या आधारावर परिक्षण करण्यात आले होते. स्पर्धेत झालेल्या वेगवेगळ्या राऊंड मधे ७० स्पर्धकांना मागे सोडून सनी शेडगे यांनी वर्ष २०२१ चा मिस्टर ब्रावोकिंग ऑफ हिंदूस्थान चा किताब जिंकला. सनी यांच्या कौशल्य व कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा प्रदान केल्या. 


स्पर्धां विजेते सनी शेडगे आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले, प्रत्येकाची आवड ही आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून देते. मला दाढीचा शौक आहे, आणि त्या दाढी मुळेच मला या स्पर्धेत सहभागी होऊन हे टायटल मिळावता आल. स्पर्धेत सहभागी होण्यापासून ते जिंकण्यापर्यंत सर्व श्रेय त्यांनी धर्मपत्नी सुप्रिया शेडगे यांना प्रदान केले. तर या शो मध्ये सुप्रिया शेडगे यांनी आकस्मित देण्यात आलेली सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील चोखपणे पार पडली. आणि आयोजकांच्या वतीने त्यांना देखील बेस्ट अँकर चा सन्मान प्रदान करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News