मोरगाव नजिक एमसीएल अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर कंपनी लि. मार्फत जैवइंधन निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन


मोरगाव नजिक एमसीएल अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर कंपनी लि. मार्फत जैवइंधन निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील पळशी मोरगाव रोडलगत तरडोली हद्दीत एमसीएल अंतर्गत अनुविरा प्रोड्युसर कंपनी लि. मार्फत जैवइंधन निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. 

   हत्ती घास, गवत, पाचट किंवा शेतातील टाकाऊ कचऱ्यापासून सीएनजी, बायो डिझल, स्वयंपाकाचा गॅस, सेंद्रिय खतं इ. उत्पादने तयार केली जाणार आहेत. शेतकऱ्यांसोबत करार करून हमी भावाने हत्ती घास (सुपर नेपियर) खरेदी केला जाणार आहे. शेतकऱ्यांना एका एकरमध्ये वर्षाला दीड लाख ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.

     शेतकऱ्यांनी फक्त हत्ती घास वाढवायचा, कंपनी १००० रुपये प्रती टन हमीभाव देउन घास कंपनी कापून घेऊन जाणार आहे.

१५०० हून अधिक बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खते व बियाने डेमो फारमिंगसाठी तालुक्यात प्रत्येक गावात उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती अनुविरा प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन गणेश कदम यांनी यावेळी दिली.

   याप्रसंगी पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, तरडोलीचे सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, बाळासाहेब जगदाळे, सतीश जगदाळे भगवान लव्हटे, रामभाऊ भोसले, लव्हटे भाऊसाहेब, विविध गावचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ व बारामती तालुक्यातील अनुविरा कंपनीचे ग्रामउद्योजक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News