संकटात संधी शोधून सकारात्मकता वाढवण्याचे काम नारीशक्तीच करेल..... डॉ.भारती चव्हाण


संकटात संधी शोधून सकारात्मकता वाढवण्याचे काम नारीशक्तीच करेल..... डॉ.भारती चव्हाण

मानिनी फाउंडेशन राज्यभर बचत गटांसाठी प्रकल्प सुरू करणारविठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर (दि.13 ऑगस्ट 2021) कोरोनाच्या जागतिक महामारीत देशाचे अर्थचक्र ठप्प झाले. आथिर्क संकटात सापडलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. अवघे समाजमन हादरवणाऱ्या या संकटात संधी शोधून सामाजिक सकारात्मकता वाढवण्याचे काम नारीशक्तीकडूनच होईल असा विश्वास मानिनी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. भारती चव्हाण यांनी व्यक्त केला.

      कोल्हापूर शहरासह परिसरातील अकरा गावात मानिनी फाउंडेशनच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांशी सुसंवाद आणि समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना मास्क आणि आरोग्य साहित्यांचे किट वाटप करण्यात आले.

    यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. चव्हाण म्हणाल्या की, कोरोनामुळे ग्रामीणभागापासून ते महानगरापर्यंत प्रचलित जीवनपद्धतीत अनेक आमूलाग्र बदल झाले. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण, विवाह, दैनंदिन व्यवहारात देखिल झालेले अनेक बदल स्विकारले पाहिजेत. आगामी काळात मानिनी फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात स्वयंरोजगारांचे तसेच वैद्यकीय समुपदेशनाचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत त्यासाठीही युवती महिला बचत गटांनी संघटीत व्हावे असेही आवाहन डॉ. भारती चव्हाण यांनी केले.

       कोल्हापुरात उलपे मळा, कसबा बावडा, सिद्धार्थ नगर, लक्षतीर्थ वसाहत यासह आंबेवाडी वडणगे आदी ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न झाले.

       कार्यक्रमाच्या आयोजनात यांच्या मानिनी फाऊंडेशनच्या कोल्हापूर समन्वयीका स्वाती शहा, उज्वला चौगुले, वैशाली महाडिक, सुप्रिया चाळके, पुनम हवलदार, सरिता हरुउगले तसेच कसबा बावडा येथील सोनाली कुंभार, सविता राजपूत, शीतल पाटील आणि सिद्धार्थ नगर येथे विद्या घोरपडे, लक्षतिर्थ वसाहत येथे सपना कांबळे, वसुधा हळदणकर, आंबेवाडी येथे दिपाली आंबी, मनीषा आंबी, रेखा आंबी. वडणगे येथे आक्काताई गोसावी, संगीता पाटील, पद्मीनी माने, सविता रायकर, सुमन डेरे, स्वप्निल देशमुख, अनिता जाधव आदींनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News