येत्या 15 ऑगस्ट 2021 संदर्भात पत्रकारांसाठी माहिती:-


येत्या 15 ऑगस्ट 2021 संदर्भात पत्रकारांसाठी माहिती:-

 यंदाच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी भारत फ्लॅग फाउंडेशन (वर्ष 21 वे) आणि स्वराज्य मीडिया ग्रुप यांच्या वतीने अभिनव उपक्रम 15 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट 2021 या दरम्यान राबवण्यात येत आहे.

 गेल्या वर्षी कोरोनामुळे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करू शकलो नव्हतो. यंदाही सावट आहेच. परंतु राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवणे हेही महत्त्वाचेच!!!

 करोना बाबतचे सर्व नियम पाळत आपण यंदा 15 ऑगस्टला सकाळी आठ वाजता ऑनलाईन झेंडावंदन; तसेच आजच्या काळाशी सुसंगत अशी अभिनव "सुराज्य प्रतिज्ञा" देशबांधवांना अर्पण करीत आहोत !!!

अत्यंत समर्पक आणि "काळाची गरज"असणाऱ्या या "सुराज्य प्रतिज्ञेचे"  प्रसारण स्वराज्य मीडिया 24च्या यूट्यूब चैनल वर होईल व ती प्रतिज्ञा सर्व प्रेक्षक आपापल्या घरातून म्हणतील.

( एक एक वाक्य निवेदक वाचेल व प्रेक्षक ते वाक्य रिपीट करतील) या ऑनलाईन कार्यक्रमासाठी चौकाचौकात मिळणारा कागदी झेंडा किंवा मुलांनी स्वतः घरी रंगवून तयार केलेला तिरंगी झेंडा सुद्धा ध्वजवंदना साठी वापरला तरी चालेल; अशी कल्पना आहे.

ऑनलाइन स्पर्धेची माहिती*:-

 तिरंगी झेंड्या जवळ थांबून सुराज्य प्रतिज्ञेचे  वाचन करावे. याचा व्हिडिओ [email protected]

 या इमेल वर 25 ऑगस्ट 2021 पर्यंत पाठवावा. त्यातून निवडक व्हिडिओजना बक्षीस मिळेल!!

 तसेच 29 ऑगस्ट 2021 रोजी प्रसारित होणाऱ्या स्वराज्य च्या यूट्यूब चैनल च्या स्पेशल फिल्ममध्ये निवडक व्हिडीओजना स्थान मिळेल!!

 विद्यार्थी, तरुण, सीनियर सिटीजन.... सर्वांसाठी ही स्पर्धा/उपक्रम खुला असणार आहे .

आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सहभागी स्पर्धकास डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल !!

राष्ट्रप्रेम नुसते मनात असून चालणार नाही तर रिझल्ट देणारे असावे; असा नवा विचार देणारी ही "सुराज्य प्रतिज्ञा" देशवासीयांच्या मनातील राष्ट्रभक्तीच्या भावनेला फलदायी  करणारी ठरावी; अशी अपेक्षा भारत फ्लॅग फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष- श्री गिरीश मुरुडकर-झेंडेवाले यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रप्रेमाची व्याख्या नव्याने मांडणारी ही प्रतिज्ञा तरूणाईला विधायक दिशेने नक्कीच घेऊन जाईल :असे मत आयोजक स्वराज्य मीडियाचे सागर ननावरे यांनी व्यक्त केले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News