ड्रग्ज कंट्रोलरला परवानग्या देण्यास वेळ लागू दिला नाही त्यामुळेच लस वेळेत उपलब्ध झाली -सायरन पूनावाला


ड्रग्ज कंट्रोलरला परवानग्या देण्यास वेळ लागू दिला नाही त्यामुळेच लस वेळेत उपलब्ध झाली -सायरन पूनावाला

पुणे:कोरोनावरील लसीची गरज कमीत कमी असावी.  मला लोकांच्या दुखातुन पैसै कमवायचे नाहीत.

अशी भावना सिरम इन्स्टिट्यूट चे सायरन पूनावाला यांनी व्यक्त केली.  मोदी सरकारने निर्णयप्रक्रियेत गतिमानता आणली.  ड्रग्ज कंट्रोलरला परवानग्या देण्यास वेळ लागू दिला नाही.  त्यामुळेच लस वेळेत उपलब्ध झाली. आधी ड्रग्ज कंट्रोलरच्या ऑफिसात लोक दिवसभर चहा पीत बसायचे. असेही ते म्हणाले. सायरन पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 देण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माहिती दिली.

राजकारणी थापा मारतात.  महिन्याला दहा किंवा अकरा कोटी लसीचे डोस देणे अवघड. 

लसीच्या किमतीत बदल झाल्याने सीरमचा नफा मोठ्या प्रमाणात बुडाला पण भारतातील लोकांना लस मिळावी यासाठी आम्ही तो सहन केला. असे ते म्हणाले.

कोव्हीशील्ड लस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातील एन्टीबॉडीज कमी होतात असा रिपोर्ट लॅन्सेटधे छापून आलाय ते खरे आहे.  त्यामुळेच तिसरा बुस्टर डोस घ्यायला हवा.  मी स्वतः तिसरा बुस्टर डोस घेतलाय.

अदर पुनावाला सुट्ठीसाठी लंडनला गेले होते. त्यांना धमकी नव्हती. या विषयाचा अधिक गवगवा करण्यात आला. त्यांनी त्याबद्दल खुलासा केला.

लसी बद्दल पण ते बोलले सर्वांना लस देणे सोपी गोष्ट नाही.  

लॉकडाउन नसायला हवा.  लॉकडाउन नसेल तर हर्ड इम्युनिटी भेटेल. असे हीते म्हणाले

मी सरकारला सांगितले की पुण्याला जास्त लस द्या कारण पुण्यात जास्त कोरोना आहे..पण ते माझे एकत नाहीत.

कोरोनावरील दोन लसींचे कॉकटेल करण्याच्या मी विरोधात.  कारण ते कॉकटेल परिणामकारक ठरले नाही तर ज्या दोन लसींचे कॉकटेल तयार करण्यात आले असेल त्या कंपन्या एकमेकांना दोष देतील.

मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालुन अतिशय वाईट गोष्ट केलीय.  माझा मुलगा मला म्हणाला की यावर तोंड उघडू नको पण मी यावर बोलणार आहे.  कारण सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील एकशे सत्तर देशांना लस पुरवते.  पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या थेशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्सने पाच हजार कोटी रुपये दिलेत.*

मी ऑनलाईन शिक्षण घेतले नाही. मी शाळेतही नीट जात नव्हतो. पवार साहेबांना विचारा.  म्हणूनच मी सीरम इन्स्टिट्यूट बांधले . असे हीते म्हणाले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News