आधुनिकतेची कास धरणारे ग्रंथपाल सुसंस्कृत समाज निर्मितीचे उद्गाते - प्रा.शिरिष मोडक


आधुनिकतेची कास धरणारे ग्रंथपाल सुसंस्कृत समाज निर्मितीचे उद्गाते - प्रा.शिरिष मोडक

अहमदनगर जिल्हा वाचनालयात ग्रंथपाल दिन कृतज्ञता सोहळा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) आत्मकेंद्रीत होणारी पिढी, माहिती तंत्रज्ञानाच्या अतिरेकी विळख्यात अडकत चालेली पिढी संवेदनशिलता हरवत चालली आहे. अशाही स्थितीत सुशिक्षित समाजाला संस्कृत करण्याचे कार्य ग्रंथालये व त्यांचा आधारस्तंभ असणारे ग्रंथपाल करत आहेत. जिल्हा वाचनालयाचा ऐतिहासिक वारसा असणारे शहर व त्यामध्ये ग्रंथपालाच्या भुमिकेत युवा प्रतिनिधीत्व करणारे ग्रंथपाल अमोल इथापे यांचे कार्य हे प्रेरणादायी व वाचन चळवळीस लोकाभिमुख असल्याचे उद्गार जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक यांनी काढले.

     ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रा.मोडक बोलत होते. यावेळी प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, प्रा.मेधाताई काळे, चंद्रकांत पालवे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल, नंदकिशोर आढाव, अविनाश रसाळ आदि उपस्थित होते.कार्यवाह विक्रम राठोड यावेळी बोलतांना म्हणाले, वाचन चळवळीचा रथ पुढे नेतांना मोबाईल रॅक, पुस्तकांचे बारकोड, सोशल मिडिया सारख्या बदलत्या माध्यमातून तरुण पिढीलाही या चळवळीत आकर्षित करण्याचे काम ग्रंथपाल इथापे व भारताल यांनी केले आहे. वाचक व कर्मचारी यांच्या समन्वयातून वृद्धींगत होणारी जिल्हा वाचनालयाची संस्कृती अभिमानास्पद असल्याचे सांगितले.     याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपाल दिनी ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. आभार गणेश अष्टेकर यांनी मानले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News