मुद्रा फौंडेशन च्या वतीने अन्न धान्य किट वाटप


मुद्रा फौंडेशन च्या वतीने अन्न धान्य किट वाटप

पुणे:मुद्रा फौंडेशन च्या वतीने फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुजित लाजूरकर यांची मुलगी मुद्रा लाजूरकर हिच्या वाढदिवसा निम्मित कोरोनाच्या महामारी मध्ये गेले 2 वर्ष शाळा बंद असल्या मुळे स्कूल व्हॅन वाले काका यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी त्यांना मदतीचा हात म्हणून किराणा किट देण्यात आले या वेळी फाऊंडेशन चे सभासद विपुल ढवळे, विनायक देसाई, विशाल आंबरे, गणेश ताजवेकर, राहुल जाधव,अक्षय सागर व इतर सभासद उपस्थित होते.

सुजित लाजूरकर म्हणाले कोरोना मुळे व टाळेबंदी मुळे 2 वर्ष शाळा बंद असल्या मुळे स्कूल व्हॅन वाले काका यांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे  .त्यांचा कडे खरे कोणी लक्ष दिले नाही.

माझ्या मुलीच्या वाढदिवसा निम्मित मी स्कूल व्हॅन वाले काका किराणा किट व गरजचे वस्तू देण्याचे ठरविले.वाढदिवसाचा खर्च टाळुन गरजू लोकांना मी मदत करण्याचे ठरविले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News