शॉर्ट टर्म कोर्स बाबत नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देणे आणि दोषींवर निलंबनाची कारवाई करावी.


शॉर्ट टर्म कोर्स बाबत नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देणे आणि दोषींवर निलंबनाची कारवाई करावी.

 वरील विषयास अनुसरून अर्ज करीत आहोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी समिती सचिवांमार्फत नेमण्यात आली होती. त्या नेमण्यात आलेल्या समितीने 7 ते 8 महिन्यात चौकशी करून चौकशी समिती अहवाल तयार केलेला आहे आणि त्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष प्राचार्य. पांडुरंग गायकवाड साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेकडे जमा केलेला आहे आम्ही सर्व विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालयाचे विद्यार्थी असून त्या नेमलेल्या समितीचा अहवाल आम्हास तक्रारदार म्हणून उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे तरीसुद्धा तो अहवाल तीन ते चार  महिने उलटून सुद्धा आम्हास देण्यात आलेला नाही  आम्ही रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य यांना वारंवार पत्रव्यवहार केला परंतु तरीसुद्धा आम्हास चौकशी समितीचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आला नाही आणि दोषींवर कारवाई देखिल करण्यात आली नाही . यासंदर्भात आम्ही रयत शिक्षण संस्था प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. या सर्व प्रकारांचा निषेध म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी 13 ऑगस्ट 2021 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोर सकाळी 11:00 वा आमरण उपोषण करणार आहोत याची  नोंद घ्यावी.

आमच्या प्रमुख मागण्या :- 

1) प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशी समितीचा अहवाल आम्हास उपलब्ध करून देण्यात यावा.

2) शॉर्ट टर्म कोर्स मधून  शैक्षणिक वर्ष 2010-11 ते 2016-17 रोजी पर्यंत शॉर्ट टर्म कोर्स मधून जमा झालेल्या निधीतून खर्च निधी वजा करता उरलेली रक्कम सर्व विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी.

3) महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स मधील भ्रष्टाचाराची संपूर्ण जबाबदारी म्हणून प्राचार्य मंजुश्री बोबडे मॅडम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

4) परशुराम बोबडे यांनी विद्यापीठ परीक्षा पेपर स्वतंत्र  वेगळ्या वर्गात बसून कॉपी करून सोडलेले आहेत त्यामुळे त्यांची ही पदवी रद्द करण्यात यावी.

                या सर्व मागण्यांसाठी आम्ही उपोषण बसलो  आहोत .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News