पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांचे उपोषण सुरु


पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांचे उपोषण सुरु

----------------

महाविद्यालयातील पदभरती सुरु करण्यासाठी राज्यातील ग्रंथपाल संघटना आक्रमक 

----------------

पुणे : १२ ऑगस्ट हा देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघ च्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून विविध मागण्यासाठी ग्रंथपालांचे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली.

गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाही ही समावेश आहे. यासंदर्भात गेली अनेक वर्षापासून शासनदरबारी पाठपुरावा तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत सोबत बैठक होऊनही अद्याप पदभरतीचा शासन निर्णय निघालेला नाही. परिणामी उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच राज्यातील पात्रताधारक आज नोकरी मिळत नसल्याने हलाकीचे जीवन जगत वनवन फिरताना दिसून येत आहेत.

ग्रंथपाल हा महाविद्यालयातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. ग्रंथालय हे त्या संस्थेचा आत्मा समजला जातो. भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी देशात ग्रंथपालांचा यथोचित गौरव केला जातो. मात्र महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे. 

येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर सुरु असलेल्या आंदोलनात १२ ऑगस्ट रोजी आंदोलनस्थळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे दिलीप भिकुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ चे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने, प्रदीप बागल, आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रिडा शिक्षक संघचे अध्यक्ष संदीप चोपडे,राजेश अगावणे, डॉ. प्रवीण पंडित, संतोष केंगले, प्रवीण घुले, आनंद नाईक, चीत्रांगिनी टाक, सरिता स्थूल, शांतीलाल अहिर, वैशाली पानसरे  आदी उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघचे अध्यक्ष प्रदीप बागल, विश्वस्त दिलीप भिकुले यांनी उपोषणात सहभाग घेऊन पाठिंबा दिला व दररोज संघटनेचे सदस्य उपोषणस्थळी उपस्थित राहून सहभाग घेतील असे सांगितले. तासेच अधिसभा सदस्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षण संघ पुणे चे अध्यक्ष डॉ. सोपान राठोड यांनी आंदोलनाला पाठिंबा देत त्यांची सदस्य आंदोलनात सहभाग घेतील असे सांगितले.

संघटनेच्या मागण्या :

अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती ही प्राचार्य पदाच्या भरतीच्या धरतीवर तात्काळ  सुरु करावी.

४ मे २०२० रोजी पदभरती वर निर्बंध लादण्या अगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी (एनओसी) मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी. 

खासगी विनानुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेली वेतनश्रेणी नुसार वेतन मिळाले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News