पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी मदनवाडी येथील सतीश शिंगाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.


पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदी मदनवाडी येथील सतीश शिंगाडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.

नानासाहेब मारकड भिगवन प्रतिनिधी:

पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या शुभ हस्ते व आदर्श जिल्हा परीषद सदस्य हनुमंत नाना बंडगर,इंदापूर तालुका उपाध्यक्ष धनंजयदादा थोरात चेअरमन विष्णुपंत देवकाते  यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष,इंदापूर तालुका युवकचे उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

शिंगाडे निवडीच्या वेळी बोलताना सांगितले की  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा  मी निष्ठावान कार्यकर्ता असुन आजपर्यंत इंदापूर तालुक्यात पक्ष बळकट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमचे मार्गदर्शक शरद पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या मतदारसंघाचे खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर   यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्यातआले आहेत वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते.या भागातील सर्व सामान्य जनतेच्या मुलाना इग्रंजी शिक्षण माफक दरात घेता याव या उदात्त हेतूने श्रीनाथ शिक्षण संस्था सुरु केली तसेच यापुढे मी पदाचा वापर पक्षवाढी साठी आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी करनार असल्याचे शिंगाडे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News