चोपडज परिसरात शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक कार्यक्रम, कृषी महाविद्यालय फलटणच्या ओंकार नेवसे यांचा उपक्रम


चोपडज परिसरात शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक कार्यक्रम, कृषी महाविद्यालय फलटणच्या ओंकार नेवसे यांचा उपक्रम

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

चोपडज परिसरात शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक कार्यक्रम फलटण तालुक्यातील कृषी महाविद्यालय फलटणमध्ये सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ओंकार बाळासाहेब नेवसे याने राबविले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संचलित कृषि महाविद्यालय फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड अंतर्गत लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले असून यात प्रामुख्याने शेतातील माती परीक्षण, बीज प्रक्रिया, जनावरांचे लसीकरण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक तण व खत व्यवस्थापन, शून्य उर्जेवर आधारित शितकक्षाची उभारणी, निंबोळी अर्क बनविणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. 

   ओंकार याला फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी.निंबाळकर, कार्यक्रम प्रमुख प्रा. एन.एस.ढालपे, प्रा.ए.एस.नगरे, डॉ. व्ही.पी.गायकवाड, प्रो. एस. वाय. लाळगे आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी चोपडज गावच्या परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News